आशाताई बच्छाव
आदिवासी समाजाचा संताप फुटला राष्ट्रपती विषयी सोनिया राहुल गांधीच्या अपमान जनक टिपणी विरोधात अमरावती जोरदार आंदोलन.
दैनिक युवा मराठा
पी.एन. देशमुख.
प्रतिनिधी.
अमरावती.
अमरावतीत आज आदिवासी समाजाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांच्या विषयी काँग्रेसने ते सोनिया आणि राहुल गांधी यांनी केलेल्या वादग्रस्त टिपणी विरोधात जोरदार आंदोलन केले .बिरसा क्रांती दलाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक कमलनारायण उईके यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी बांधवांनी इरीन चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतीच्या अभिभाषनानंतर सोनिया गांधींनी “पुअर लेडी” तर राहुल गांधींनी “बोरिंग “असे शब्द वापरल्याने देशभरात संताप व्यक्त, होत आहे .आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रपतीचा अशा प्रकारे अपमान केल्याबद्दल निषेध करण्यात आला .आंदोलन दरम्यान आदिवासी समाजाच्या इतर मागण्याची पाठपुरावा करण्यात आला .यामध्ये मेळघाट वगळता५0, टक्के पेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये पेसा कायदा लागू करणेपेसा कायदा लागू करणे, धारणी येथील प्रकल्प कार्यालय अमरावतीत स्थलांतरित करणे वरुड येथे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह उभारणे ,आणि अपर आदिवासी कार्यालयाच्या नुक्लीअसं बजेटमध्ये नवीन न पूर्ण बदल करण्याची मागणी करण्यात आली .मोर्चा जिल्ह्यातील विविध आदिवासी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होतेव, सहभागी झाले होते.






