Home अमरावती आंतरराज्य चोरट्यांची शटर डाऊन: मिरज तालुक्यातील लिंगनूर मधून४0.पेक्षा जास्त घरफोड्या करणाऱ्या गुन्हेगाराला...

आंतरराज्य चोरट्यांची शटर डाऊन: मिरज तालुक्यातील लिंगनूर मधून४0.पेक्षा जास्त घरफोड्या करणाऱ्या गुन्हेगाराला अटक.

107

आशाताई बच्छाव

1001208169.jpg

आंतरराज्य चोरट्यांची शटर डाऊन: मिरज तालुक्यातील लिंगनूर मधून४0.पेक्षा जास्त घरफोड्या करणाऱ्या गुन्हेगाराला अटक.
दैनिक युवामराठा
पी.एन. देशमुख.
प्रतिनिधी.
अमरावती.
अमरावती येथील फेदरपुरा पोलिसांनी आंतरराज्यीय, सराईत घरफोडी करणारा गुन्हेगार, लोकेश रावसाहेब सुतार याला अटक केली आहे ४0 हुन अधिक घरफोडी, करणाऱ्या या आरोपीला त्याच्या मूळ गावी मिरज तालुक्यातील लिंगनूर येथून ताब्यात घेण्यात आले उमेश एकनाथ आगलावे यांच्या घरी झालेल्या चोरीच्या घटनेनंतर पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला आरोपीने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला .आणि लाकडी कपाटातून २ लाख रुपये लंपास केले होते पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज वाहनाची माहिती हॉटेल्स आणि लॉज मधील नोंदी तपासून आरोपीचा मागवा घेतला .सांगली आणि कोल्हापूर परिसरात शोध मोहीम राबवल्यानंतर गुप्त बातमीदाराच्या माहितीच्या आधारे त्याला अटक करण्यात यश मिळाले .पोलिसांनी त्यांच्याकडून साठ हजार रुपये जप्त केले आहेत .याशिवाय याशिवाय त्याचा साथीदार सुखदेव उर्फ बंडू हनुमंत नाईक यालाही अटक करण्यात आली .पोलीस आयुक्त कैलास फुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली फ्रेझर पुरा पोलीस ठाण्याच्या अमरावती पथकाने ही कारवाई यशस्वी केली.पोलीस आयुक्त कैलास पुंडकर, यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावती फ्रेदर पुरा पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.या पथकात पोलीस निरीक्षक निलेश करे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश गावंडे यांच्यासह, डीबी पथकाचेसदस्य व , इतर पोलीस, कर्मचारी होते.