Home जळगाव रस्त्यावर खाजगी ट्रॅव्हल्स उभ्या केल्यास दंडात्मक कारवाई चाळीसगावात पोलीसांचा इशारा

रस्त्यावर खाजगी ट्रॅव्हल्स उभ्या केल्यास दंडात्मक कारवाई चाळीसगावात पोलीसांचा इशारा

111

आशाताई बच्छाव

1001150434.jpg

रस्त्यावर खाजगी ट्रॅव्हल्स उभ्या केल्यास दंडात्मक कारवाई
चाळीसगावात पोलीसांचा इशारा

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- शहरात रस्त्यांवर खाजगी ट्रॅव्हल्स उभ्या करून अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न झाला तर अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा शहर वाहतुक शाखेच्या सहाय्यक निरीक्षकांनी दिला.
चाळीसगाव शहरात बसस्टँड व भडगांव रोड काही खाजगी ट्रॅव्हल्स व उभ्या राहत असल्याने नागरीकांमध्ये मोठ्या प्रमाणावर ओरड होती. या पाश्‍वभूमीवीर या परिसरातील ट्र्राफीक जाम होण्याचे समस्येवर उपाययोजना करणेकरीता ट्रॅव्हल्स बुकींग एजंटांची चाळीसगाव शहर वाहतुक शाखेच्या कार्यालयात आज रोजी सहाय्यक निरीक्षक प्रदीप एकशिंगे यांनी बैठक घेतली. यावेळी दररोज रात्री 7.30 ते 9 वाजेच्या दरम्यान खाजगी ट्रॅव्हल्सचालक आपल्या बसेस प्रवासी घेण्याकरीता रस्त्यावरच उभ्या करतात. त्यामुळे रस्त्यावर वाहतुक जाम होवुन नागरिकांना तसेच व्यापार्‍यांना त्रास होतो.
हा त्रास होवु नये म्हणुन ट्रॅव्हल्स बसेस रस्त्यावर उभ्या करु नये. ट्रॅव्हल्स बसेसमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला तर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा सहाय्यक निरीक्षकांनी यावेळी दिला. सर्व ट्रॅव्हल्स चालक व मालक यांनी मोटार वाहन कायद्यातील सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत सुचना देखील त्यांनी यावेळी दिल्या.

Previous articleवाघळी येथील ज्वेलर्स दुकानातुन 27 हजाराच्या चांदीच्या अंगठ्या लंपास
Next articleपत्रकार व सामाजिक कार्यकर्ते डी जी रंगारी समाजभूषण पुरस्काराने सन्मानित
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.