आशाताई बच्छाव
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिंचखेडा द्वितीय
जाफराबाद तालुका प्रतिनिधी – मुरलीधर डहाके
दिनांक- 11/01/2025
ज्ञानसागर महाविद्यालय जाफराबाद येथे आयोजित 52 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिंचखेडा च्या विद्यार्थ्यांनी शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान या विषयाअंतर्गत नैसर्गिक शेती यासंबंधी प्रतिकृती तयार करून उत्कृष्ट सादरीकरण करून द्वितीय क्रमांक मिळवला.यशस्वी विद्यार्थी कार्तिक विठ्ठल पाबळे, हर्षल श्रीराम सरोदे, ओम भाऊसाहेब गवळी, ओम राजू सरोदे,असित दादाराव साबळे,नंदकिशोर श्रावण साबळे यांचे गटशिक्षणाधिकारी सतीश शिंदे,गटविस्तार अधिकारी जिनेंद्र काळे,ज्ञानसागर माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य निवृत्ती दिवटे,सरपंच सौ.सविता भालचंद्र सरोदे, व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजू सरोदे,वसंता शेवाळे,संतोष साळोख, अनिल भोसले,गौतम राऊत,राजेंद्र भुजबळ यांनी अभिनंदन केले. यशस्वी विद्यार्थ्यांना संदिप जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.






