Home जालना माहोरा येथे मोकाट कुत्र्यांची दहशत नागरीक भयभीत

माहोरा येथे मोकाट कुत्र्यांची दहशत नागरीक भयभीत

125

आशाताई बच्छाव

1001143460.jpg

माहोरा येथे मोकाट कुत्र्यांची दहशत नागरीक भयभीत
जाफराबाद तालुका प्रतिनिधी – मुरलीधर डहाके

दिनांक 11/01/2025

सविस्तर वृत्त असे की जाफराबाद तालुक्यातील माहोरा या गावी आणि परिसरात कुत्र्यांचे अक्षरशः टोळ्याच टोळ्या रात्रं दिवस गावभर फिरत असतात या मोकाट कुत्र्यांच्या टोळक्यामुळे गावात आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात व बस स्थानक परिसरात नागरिका मध्ये मोठी दहशत पसरली आहे. या मध्ये महीला आणि लहान मुले तर फारच घाबरतांना दिसत आहे.या कुत्र्यांचा बंदोबस्त ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ करावा अशी मागणी नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे . माहोरा गावात गल्ली बोळात कुत्र्यांची टोळकी फिरताना दिसतात. तसेच माहोरा चौफुलीवर नेहमीच वाहनांची गर्दी असते .त्यामुळे बऱ्याच वेळा मोटार सायकल अपघात सुध्दा झालेले आहे. तसेच शाळा बस स्थानक परिसरात असल्यामुळे लहान मुलांचे येणे जाणे मोठ्या प्रमाणात आहे . या अगोदर काही जणांवर कत्र्यांनी हल्ला सुध्दा केलेला आहे.त्यासाठी सरपंच व ग्रामसेवक साहेबांनी लक्ष घालुन कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी माहोरा येथिल नागरिकांची मागणी आहे.