आशाताई बच्छाव
उपमुख्यमंत्री साहेब देशातील मतदार प्रत्येक मंत्र्यांचा मालक
मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा
बीड : दि. ०८ जानेवारी २०२५ मतदान केले म्हणजे तुम्ही काय माझे मालक झालात अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गरळ ओकत मतदार राजाचा अवमान केला असल्याचे मत जनतेतून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि परभणी जिल्ह्यातील सोमनाथ सुर्यवंशी यांची परभणी शहरातील पोलिस ठाण्यात झालेली हत्या यामुळे महाराष्ट्रातील राजकीय पक्षातील नेते पुढारी आणि पदाधिकारी यांची कोंडी झाल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रातील राजकारण भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचार, गुन्हेगारीने बरबटले असून महाराष्ट्रातील अनेक प्रकरणात राजकीय पक्षातील नेते पुढारी पदाधिकारी यांचे हातही बरबटले असल्याचे मत जनतेतून येत आहे. बारामती येथील एका पेट्रोल पंपाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तुम्ही मला मत दिले म्हणजे माझे मालक झाला नाहीत असे म्हणत देशातील मतदार राजाचा अवमान केला असल्याचे मत महाराष्ट्रातील जनतेतून येत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून संसदेत संविधानाच्या प्रस्ताविकाचे वाचन करून घेण्याची गरज आहे. देशातील मतदार राजाने राजकीय पक्षातील प्रत्येक मंत्र्याला मतदान करून मतदार राजाचे प्रश्न आणि अडचणी संसदेत मांडण्यासाठी भारतीय संविधान आणि संविधानामुळे मिळालेल्या लोकशाहीच्या माध्यमातून मतदान करून देशाची आणि देशातील जनतेची सेवा करण्याची संधी भारत देशातील संविधानाने आणि येथील मतदार राजाने दिली आहे. तेव्हा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारच काय या देशातील प्रत्येक मंत्री आणि लोकप्रतिनिधी हा या देशाचा आणि देशातील जनतेचा सेवक आहे. तेव्हा प्रत्येक राजकीय पक्षातील नेते पुढारी आणि पदाधिकारी यांनी संविधानाच्या प्रस्ताविकाचे वाचन करून घेणे गरजेचे आहे.






