Home बुलढाणा दणका! बुलडाणा शहरातील ८ खाजगी दवाखाने बंद होणार? नगरपालिकेची नोटीस ! आग...

दणका! बुलडाणा शहरातील ८ खाजगी दवाखाने बंद होणार? नगरपालिकेची नोटीस ! आग प्रतिबंधक उपाययोजना न करणे भोवले…”या” दवाखान्यांचा समावेश..!

107

आशाताई बच्छाव

1001130785.jpg

दणका! बुलडाणा शहरातील ८ खाजगी दवाखाने बंद होणार? नगरपालिकेची नोटीस ! आग प्रतिबंधक उपाययोजना न करणे भोवले…”या” दवाखान्यांचा समावेश..!
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :- बुलडाणा शहरातील आठ खाजगी दवाखान्यांना बुलदाणा नगरपालिकेने नोटीस दिलेली आहे. पुढच्या 7 दिवसांत दवाखान्याच्या इमारत खाली करण्याच्या सूचना नगरपालिका प्रशासनाने दिल्या आहेत. फायर ऑडिट न करणे, दवाखान्यात पुरेशा प्रमाणात आग प्रतिबंधक उपाययोजना न करणे हॉस्पिटलच्या संचालकांच्या अंगलट आले आहे…
बुलडाणा शहरात मोठ्या संख्येत खाजगी दवाखाने आहेत. शहरातील ७० पेक्षा अधिक दवाखान्यात रुग्णांना भरती करण्याची व्यवस्था आहे. दरम्यान खाजगी दवाखान्यांना फायर ऑडिट करणे अनिवार्य आहे. मात्र अनेक दवाखान्यांच्या संचालकांचे याकडे दुर्लक्ष झाले. परिणामी नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांच्या सूचनेवरून नगर परिषदेच्या अग्निशामक विभागाने शहरातील आठ दवाखान्यांना नोटीस दिलेली आहे.

Previous articleबापरे! बुलढाण्यात टक्कल व्हायरसचा थैमान, ३ दिवसांतच पडतंय टक्कल ! नेमका काय आहे प्रकार?
Next articleउपमुख्यमंत्री साहेब देशातील मतदार प्रत्येक मंत्र्यांचा मालक
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.