Home बुलढाणा बापरे! बुलढाण्यात टक्कल व्हायरसचा थैमान, ३ दिवसांतच पडतंय टक्कल ! नेमका काय...

बापरे! बुलढाण्यात टक्कल व्हायरसचा थैमान, ३ दिवसांतच पडतंय टक्कल ! नेमका काय आहे प्रकार?

149

आशाताई बच्छाव

1001130771.jpg

बापरे! बुलढाण्यात टक्कल व्हायरसचा थैमान, ३ दिवसांतच पडतंय टक्कल ! नेमका काय आहे प्रकार?
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-शेगाव तालुक्यात केस गळतीमुळे नागरिक भयभीत झाले आहे. वेगळ्या व्हायरसची एन्ट्री झाली का? अशी भीती नागरिकांमध्ये आहे. बुलढाण्यातली शेगाव तालुक्यात काही गावामधे नागरिकांना केसगळतीची समस्या जाणवत आहे. तीन दिवसांतच टक्कल पडत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. अनेकांनी खासगी रूग्णालयाची वाट धरली आहे, मात्र अद्याप हे का होतेय, याचं कारण समजू शकले नाही.

लक्षणे काय ?
शेगाव तालुक्यातील बोंडगाव, कालवड, हिंगणा या गावात या अज्ञात व्हायरसने थैमान घातले आहे. या विषाणूची कुटुंब ची कुटुंब बळी ठरत आहेत. अगोदर डोके खाजवणे, नंतर हातात सरळ केस येणे आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडतोय. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
सरकारचे दुर्लक्ष, नागरिकांमध्ये भीती