Home जळगाव चाळीसगाव महाविद्यालयात लेखक वाचक संवाद कार्यक्रम संपन्न

चाळीसगाव महाविद्यालयात लेखक वाचक संवाद कार्यक्रम संपन्न

141

आशाताई बच्छाव

1001124246.jpg

चाळीसगाव महाविद्यालयात लेखक वाचक संवाद कार्यक्रम संपन्न

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- आजच्या तरुण पिढीत वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि त्या योगे समाजिक प्रबोधन होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत 6 रोजी लेखक – वाचक संवाद हा कार्यक्रम येथील बी.पी. आर्ट्स, एस. एम. ए. सायन्स आणि के. के. सी. कॉमर्स कॉलेज चाळीसगाव महाविद्यालयाचा ग्रंथालय विभाग तर्फे आयोजित करण्यात आला.
याप्रसंगी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक, कवी, प्रा. डॉ. वी. रा. राठोड,कवयित्री आणि प्राध्यापिका मनीषा सूर्यवंशी आणि एन वाय एन सी. महाविद्यायाचे प्रा. लेखक डॉ. व्ही.पी. शिरसाट यांनी वाचकांशी संवाद साधला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. व्ही. बिल्दीकर , उपप्राचार्य डॉ. ए. व्हि. काटे सर यांनी मार्गदर्शन केले. उपप्राचार्य दीपक आवटे यांची कार्यक्रमास विशेष उपस्थित होते. डॉ. पूनम निकम यांनी अध्यक्षीय भाषण केले, सादर कार्यक्रमास प्रा. डॉ. आर. आर. बोरसे,प्रा. जयश्री पवार, प्रा.रेणुका पवार, स्वाती अमृतकर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
प्रास्ताविक ग्रंथपाल डॉ. अर्चना कुलकर्णी यानी केले, सूत्रसंचलन सहा. ग्रंथपाल नितीन अहिरे यांनी केले तर आभार सचिन जाधव यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशास्विते साठी नरेंद्र देशमुख, कैलास बागुल, निकिता पाटील यांनी परिश्रम घेतले.