Home उतर महाराष्ट्र वाकडीच्या जयंत काळेची महाराष्ट्र राज्याच्या कबड्डी संघात निवड!!

वाकडीच्या जयंत काळेची महाराष्ट्र राज्याच्या कबड्डी संघात निवड!!

92

आशाताई बच्छाव

1001121347.jpg

वाकडीच्या जयंत काळेची महाराष्ट्र राज्याच्या कबड्डी संघात निवड!!

श्रीरामपूर, दिपक कदम तालुका प्रतिनिधी:
नुकत्याच सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशन व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने ५० वी कुमार व कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेमध्ये आझाद क्रीडा मंडळचा खेळाडू जयंत बाळासाहेब काळे याची महाराष्ट्र राज्याच्या संघामध्ये निवड झाली आहे.
उत्तराखंड येथे होणार अमेचर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने उत्तराखंड कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने
५० वी कुमार-कुमारी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेमध्ये जयंत काळे महाराष्ट्र संघामध्ये आपल्या खेळाची चमक दाखवणार आहे.सांगली येथे झालेल्या स्पर्धेमध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. गेली २ ते ३ वर्षापासून तो टाकळीभान येथील आझाद क्रीडा मंडळ या ठिकाणी कबड्डीचा सराव करत आहे. जयंत हा वाकडी येथील प्रगतशील शेतकरी श्री हरिभाऊ विठ्ठल काळे यांचा नातू व बाळासाहेब हरिभाऊ काळे यांचा चिरंजीव आहे.कबड्डी खेळाचे तज्ञ प्रशिक्षक रवींद्र गाढे यांचे त्याला मार्गदर्शन लाभले.निवड झाल्याबद्दल त्याचे व्यवस्थापक अक्षय थोरात व सर्व आझाद क्रीडा मंडळाचे खेळाडू, क्रीडाप्रेमी व टाकळीभान येथील पदाधिकारी त्यांचे अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.

Previous articleक्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंती उत्सव उत्साहात साजरा
Next articleस्वर्गीय आमदार पी. एन. पाटील साहेब यांना ७२ व्या जयंतीनिमित्त श्रध्दांजली कार्यक्रम
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.