Home कोल्हापूर स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील साहेब यांना ७२ व्या जयंतीनिमित्त श्रध्दांजली कार्यक्रम

स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील साहेब यांना ७२ व्या जयंतीनिमित्त श्रध्दांजली कार्यक्रम

105

आशाताई बच्छाव

1001121370.jpg

स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील साहेब यांना ७२ व्या जयंतीनिमित्त श्रध्दांजली कार्यक्रम

कोल्हापूर (अविनाश शेलार ब्युरो चीफ) लोकनेते कैलासवासी पी एन पाटील एक
काँग्रेस निष्ठावंत, दिवंगत आमदार पी. एन. पाटील साहेब यांच्या 72 व्या जयंती निमित्त त्यांचे जीवन, वारसा आणि त्यांनी समाजासाठी दिलेलं निःस्वार्थ योगदान याला आदरांजली वाहण्यासाठी सोमवार, दिनांक 6 जानेवारी रोजी सकाळी 10:00 वाजता, कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी येथे सर्वपक्षीय आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. असे कळविले आहे या कार्यक्रमास
कोल्हापूरचे खासदार आदरणीय छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत, स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील साहेब यांच्या राजकीय जीवनातील आणि कर्तृत्वाविषयीच्या आठवणी, अनुभव यांना उजाळा देत समाजातील विविध घटकांमार्फत आदरांजली देण्यात येणार आहे.
स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील साहेब यांना त्यांच्या जयंतीदिनी आदरांजली वाहण्यासाठी सर्व कोल्हापूर वासियांनी उपस्थित राहावे असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्ष गटनेते आमदार सतेज (बंटी) पाटील साहेब यांनी केले आहे हा कार्यक्रम काँग्रेस कमिटी स्टेशन रोड कोल्हापूर येथे होणार आहे

Previous articleवाकडीच्या जयंत काळेची महाराष्ट्र राज्याच्या कबड्डी संघात निवड!!
Next articleनिर्मला कांबळे व सिद्धार्थ कांबळे यांच्या मागणीला यश वरवडा येथील संविधान सभागृह, बुद्ध विहार, तसेचस्मशान भूमीचा मार्ग मोकळा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.