Home बुलढाणा ब्रेकिंग ! बालिकेवर कुकर्म करून केली हत्या ! – शेगाव येथील लॉज...

ब्रेकिंग ! बालिकेवर कुकर्म करून केली हत्या ! – शेगाव येथील लॉज मालकाला विकला होता मोबाईल ! – नराधम विशाल गवळीसह त्याची पत्नी साक्षीला न्यायालयीन कोठडी !

131

आशाताई बच्छाव

1001120018.jpg

ब्रेकिंग ! बालिकेवर कुकर्म करून केली हत्या ! – शेगाव येथील लॉज मालकाला विकला होता मोबाईल ! – नराधम विशाल गवळीसह त्याची पत्नी साक्षीला न्यायालयीन कोठडी !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा:-शेगाव कल्याण परिसरात एका बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या आणि संत नगरी शेगाव येथील लॉज मालकाला मोबाईल विकणाऱ्या आरोपी विशाल गवळीसह
त्याची पत्नी साक्षी हिला शनिवारी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने 18 जानेवारीपर्यंत (14 दिवस) न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सदर आरोपी शेगावातील एका लॉज मध्ये लपून बसले असतांना, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. याप्रकरणी सर्वप्रथम ‘हॅलो बुलढाणा’ ने बातमी प्रसारीत करून खळबळ उडवून दिली होती.
कल्याणमधील बालीकेवर लैंगिक अत्याचार करुन हत्या केल्या प्रकरणी प्रमुख आरोपी विशाल गवळीला शेगावातील एका गावामधून पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या.
23 तारखेला संध्याकाळी कल्याण पूर्वेतून बालीकेचे अपहरण झाले होते. आईकडून 20 रुपये घेऊन अल्पवयीन मुलगी खाऊ आणण्यासाठी दुकानात गेली होती. बालीका परत न आल्याने कुटुंबाने मुलीचा शोध सुरू
केला. मुलीच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार कोळसेवाडी पोलीस ठाण्यात केली. 24 डिसेंबर रोजी बालीकेचा मृतदेह कल्याण नजीक बापगाव परिसरात सापडला. दरम्यान पोलिसांनी तपासचक्र फिरविले असता, आरोपीवर संशय आल्याने त्याला तूझा मोबाईल कुठे आहे? असे विचारले असता त्याने कसारा घाटात फेकून दिल्याची माहिती दिली. नंतर त्याने सदर मोबाईल बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील एका लॉज मालकाला 5 हजार रुपयांमध्ये विकल्याची कबुली दिली. दरम्यान संबंधित लॉज मालकाशी संपर्क साधला तेव्हा मालकांनी मोबाईल व सिम कार्ड पोलिसांना देण्याची तयारी दाखवली आणि या मोबाईलच्या माध्यमातून विशालने ही हत्या करताना आणखी कोणाला संपर्क केला होता काय? याचा तपास आता सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्ह्यातील होंडा शाईन दुचाकी देखील ताब्यात घेतली आहे.

Previous articleब्रेकिंग – कृषी विभागातील कोट्यवधींचा घोटाळाः दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाईची शक्यता !
Next articleक्राईम ! चाकूच्या धाकावर बारमालकाला लुटले ! – दोन आरोपींची जिल्हा कारागृहात रवानगी!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.