Home जालना जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त...

जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन

237

आशाताई बच्छाव

1001114222.jpg

जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ,
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन
प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक 03/01/2025
जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भाटेपुरी ता. जि.जालना या शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सावित्रीबाईंनी मुलींसाठी शिक्षणाची दारे खुली करून दिली याची जाणीव विद्यार्थ्यांनी ठेवावी व आपल्या प्रगतीच्या कक्षा कशा उंच होतील या दृष्टीने प्रयत्न करावे. ही जाण आपण ठेवली पाहिजे आणि त्यांचा आदर्श समोर ठेवून आपण उच्च शिक्षण घेऊन सुसंस्कृत बनावे असं मत मुख्याध्यापक श्री आर. ए. आटोळे सर यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभागाचे प्रमुख श्री आर .बी. जाधव यांनी केले तर आभार श्री. जी. एस. लोखंडे यांनी मानले.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे अहिल्यादेवी शिक्षण प्रसारक मंडळ खाणेपुरीचे संचालक श्री शिवाजी माळशिखरे व ज्येष्ठ शिक्षक श्री आर. पी. काळे होते.
यावेळी विद्यालयाच्या विद्यार्थिनी कु.रेणुका बोंबले ,कु.वैशाली डोईफोडे, कु.अंजली घोलप, कु.अंजली करडे ,यांनी गीत व पोवाडे सादर करून सावित्रीबाईंच्या जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. अनिल गावडे .प्रा.अनिता आटोळे , श्री. एस. एस .पवार, श्री व्ही. एच. काळे, श्री आर .ए. पाटील, श्री एच. एन. मोरे, श्री तायडे जी. के., श्री नितेश खटके, श्री देवराव गाढे, दीपक धुमाळ यांनी परिश्रम घेतले.