आशाताई बच्छाव
बीड जिल्ह्यातील मस्सोजोग गावाचे आदर्श सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकरी यांना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा द्या….
सरपंच परीषद धुळे जिल्हा समन्वयक तथा उपसरपंच दिपक जाधव यांची निवेदनाद्वारे प्रशासनाकडे मागणी….
धुळे/साक्री/वासखेडी (विभागीय संपादक दिपक जाधव) – येथील बीड जिल्ह्यातील मस्सोजोग गावाचे आदर्श सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या मागील असलेल्या मारेकरी यांना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा द्यावी यासाठी साक्री तालुक्यातील तहसीलदार साहेबराव सोनवणे यांना सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र च्या धुळे जिल्ह्याच्या वतीने जिल्हा समन्वयक तथा उपसरपंच ग्रामपंचायत वासखेडी दिपक जाधव व सरपंचांच्या वतीने निवेदन देण्यात आले….
निवेदनात म्हटले आहे की,बीड जिल्ह्यातील मस्सोजोग गावाचे सरपंच यांचे अपहरण करून निघृण झालेली हत्या सकल समाजात काळीमा फासणारी घटना आहे या घटनेने संपुर्ण महाराष्ट्र हादरला आहे,याचा धुळे जिल्ह्याच्या वतीने येत्या ४जानेवारी रोजी ग्रामपंचायत कडकडीत एक दिवस बंद ठेवून जाहीर निषेध करण्यात येणार आहे,अशा संपुर्ण महाराष्ट्रात होत असलेल्या घटना तात्काळ थांबल्या पाहीजेत,अशा घटनांवर शासनाने कडक पावले उचलावीत,यासाठी सरपंच संघटना संपुर्ण महाराष्ट्रात आक्रमक झाल्या आहेत, साक्री तालुक्यातील तसेच धुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायत येत्या ४जानेवारी रोजी बंद ठेवाव्यात असे आव्हान करण्यात येत असुन,या आव्हानाला सरपंच व सदस्यांनी शंभर टक्के प्रतिसाद द्यावा व ग्रामपंचायत कामकाज बंद ठेवण्यात यावे,असे आवाहन सरपंच परीषद मुंबई महाराष्ट्र च्या धुळे जिल्हा समन्वयक तथा ग्रामपंचायत वासखेडी उपसरपंच दिपक जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे,सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांड प्रकरणी सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र चे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात गुन्हा तपासणी व आरोपी अटके संबंधित परिषदेने, निषेध निवेदने, मोर्चा,बंद, आंदोलने अशा अनेक मार्गांनी शासनाचे लक्ष वेधून घेतले आहे, वरील निवेदनाच्या प्रती , महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री,धुळे जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक यांना पाठवण्यात आल्या आहेत,
तसेच सरपंच परीषद मुंबई महाराष्ट्र यांनी जाहीर केले प्रमाणे ७जानेवारी रोजी , आझाद मैदान मुंबई येथे राज्यातील सरपंच एक दिवस लक्षवेधी धरणे आंदोलन करतील असा इशारा धुळे जिल्हा समन्वयक तथा ग्रामपंचायत वासखेडी उपसरपंच दिपक जाधव व पदाधिकारी यांनी दिला आहे,
यावेळी कासारे जि.प.सदस्य गोकुळ परदेशी,भाडणे लोकनियुक्त सरपंच अजय सोनवणे,अक्षय पोपटराव सोनवणे,भाजपाचे युवा नेते सागर बोरसे, इंजीनिअर रोहीत दहीते,नाना शेलार, राहुल गवळे,संजय पाटील,जयेश बावा, शशिकांत अहीरराव, प्रदीप सोनवणे,खेमराज बागुल,पवन साळुंखे , समाधान सुर्यवंशी, राजेंद्र कोरडकर, नितिन ठाकरे, विलास सोनवणे व तालुक्यातील सरपंच, उपसरपंच सदस्य आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते,






