आशाताई बच्छाव
जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जिल्हा नियोजन भवनाच्या नवीन वास्तूत कामकाजास केली सुरुवात
जालना/ दिलीप बोंडे ब्युरो चीफ
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात उभारण्यांत आलेल्या जिल्हा नियोजन भवनाच्या सुसज्ज अशा नवीन ईमारतीत आज दिनांक 01 जानेवारी 2025 रोजी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आपल्या कामकाजास सुरुवात केली आहे.
या प्रसंगी जिल्हाधिकारी यांना नवीन इमारतीत व नववर्षाच्या शुभेच्छा अपर जिल्हाधिकारी श्रीमती रिता मेत्रेवार, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक, जिल्हा पुरवठा अधिकारी, श्रीमती सविता चौधर, उप जिल्हा निवडणूक अधिकारी, शशिकांत हदगल, उप जिल्हाधिकारी भूसंपादन (लसीका), श्रीमती सरीता सुत्रावे, उप जिल्हाधिकारी सामान्य प्रशासन, श्रीमती नम्रता चाटे, उपजिल्हाधिकारी रोहयो, श्रीमती मनिषा दांडगे, जिल्हा नियोजन अधिकारी, सुनिल सुर्यवंशी, तहसिलदार जालना, श्रीमती छाया पवार, तहसिलदार महसूल श्रीमती प्रणाली तायडे, तहसिलदार अंबड, विजय चव्हाण, नायब तहसिलदार गिरगे, इंटीरिअर डिझायनर, श्रीमती रुपम घुगे, यांच्यासह इतर अधिकारी/कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी कार्यालयातील सर्व कार्यालयीन प्रमुखांची बैठक आयोजित करुन त्यांना नवीन वर्षात लोकाभिमुख प्रशासन करण्यासाठी सुचना दिल्या.






