आशाताई बच्छाव
व्हॉटसअपवरून तरुणीकडे व्यक्त केली लैंैगिक संंबंधाची इच्छा – अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- एका व्यक्तीने चक्क व्हॉटसअपवरून 21 वर्षीय महिलेकडे लैगिंक संंबंधाची इच्छा व्यक्त केल्याची खळबळजनक माहीती समोर आली असून याप्रकरणी अज्ञात मोबाईलधारकाच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती अशी की, मालेगाव भागातील फिर्यादी 21 वर्षीय महिला चाळीसगाव तालुक्यातील एका गावात तिच्या आई वडिलांकडे असतांना दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी मध्यरात्री पाऊण वाजेच्या सुमारास या महिलेच्या मोबाईलच्या व्हॉटसअप अकाउंटवर अज्ञात व्यक्तीने त्याच्या मोबाईलच्या व्हॉटसअप संदेशाद्वारे फिर्यादी तरूणीशी उघड उघड लैंगिक गोष्टीची मागणी करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला
व फिर्यादी तरूणीचा फोटो तिच्या संमतीशिवाय व्हॉटसअप अकाउंटच्या डीपीवर ठेवला व फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.
या प्रकरणी तरुणीने चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला धाव घेऊन पोलीसांना झाला प्रकार सांगितला. या प्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून अश्लिल संदेश पाठवणार्या मोबाईलधारक अज्ञात व्यक्तीच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता कलम 75(1),(आय),351(4), आयटी अॅक्ट कलम 67 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यचा तपास पोलीस निरीक्षक राहूलकुमार पवार हे करीत आहेत.






