Home बुलढाणा डोणगाव युवकांची अनोखी मानवताः बेशुद्ध गाईला दिले जीवनदान ! गौमातेसाठी एकजुट तरुणांचे...

डोणगाव युवकांची अनोखी मानवताः बेशुद्ध गाईला दिले जीवनदान ! गौमातेसाठी एकजुट तरुणांचे कौतुकास्पद कार्य !

107

आशाताई बच्छाव

1001110296.jpg

डोणगाव युवकांची अनोखी मानवताः बेशुद्ध गाईला दिले जीवनदान ! गौमातेसाठी एकजुट तरुणांचे कौतुकास्पद कार्य !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :– डोंगगावं मेहकर नवीन वर्षाच्या स्वागताच्या जल्लोषात डोणगाव येथील युवकांनी मानवी संवेदनशीलतेचा उत्कृष्ट आदर्श घालून दिला. मध्यरात्री राष्ट्रीय महामार्गावरील डोणगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर एक गाय
बेशुद्ध अवस्थेत पडल्याची घटना समोर आली. त्या वेळी, सर्वत्र नवीन वर्षाचे स्वागत जोरदार साजरे होत असताना, काही युवकांनी आपल्या दारू, डॉल्बी आणि पार्टीच्या आनंदाला दुय्यम मानत गाईला वाचवण्याचा निर्धार केला.

रेहेमतिया सोशल ग्रुपचे अध्यक्ष जैनुल आबेद्दीन शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रात्री गाईची अवस्था पाहून गोप्रेमी नागेश परमाळे यांना संपर्क साधला. तत्काळ परिस्थितीचे गांभीर्य ओळखत नागेश परमाळे यांनी जेसीबीच्या सहाय्याने गाईला डोणगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात हलवले.
डॉ. आनंद आस्वार आणि त्यांचे सहकारी संतोष बोचरे
यांनी तातडीने उपचार करून गाईचे प्राण वाचवले. या कार्यात नागेश परमाळे, दीपक इंगळे, विशाल पांडव, मुन्ना आंबेकर, राम फिसके, विजय भंडारे, कृष्णा शेळके, आदित्य नवघरे, सागर ताठे, तसेच पत्रकार देविदास खनपटे, गणेश लहाने, आवेज पठाण यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

सरत्या वर्षाचा निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्याच्या जल्लोषात कोणीही मदतीसाठी पुढे येत नसताना, या युवकांनी दाखवलेली संवेदनशीलता आणि तत्परता कौतुकास्पद आहे. त्यांच्या या कृत्याने डोणगाव गावातच नव्हे तर संपूर्ण समाजात सकारात्मक संदेश दिला आहे.

Previous article!स्वामी विवेकानंद महाविद्यालयात रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन
Next articleदुर्दैवी ! नवीन वर्षात नियतीने डाव साधला ! – जालना येथील अपघातात बुलढाण्याचे चार ठार !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.