Home नांदेड मुक्रमाबाद येथे व्हाईस आॕफ मीडीया शाखेची स्थापना

मुक्रमाबाद येथे व्हाईस आॕफ मीडीया शाखेची स्थापना

141

आशाताई बच्छाव

1001110252.jpg

मुक्रमाबाद येथे व्हाईस आॕफ मीडीया शाखेची स्थापना

मुखेड युवा मराठा न्यूज नेटवर्क बस्वराज वंटगिरे

मुखेड तालुक्यातील
मुक्रमाबाद येथील शासकीय विश्रामगृहात दि. 29 रवीवार रोजी व्हाईस आॕफ मीडीयाची बैठक पञकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश जोशी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. प्रारंभी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व मराठी पञकारितेचे जनक दर्पणकार बाळशास्ञी जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर या बैठकीत सर्वानुमते व्हाईस आॕफ मीडीया शाखा मुक्रमाबाद ची नुतन कार्यकारणी जाहिर करण्यात आली. यामध्ये व्हाईस आॕफ मीडीया मुक्रमाबाद अध्यक्षपदी रज्जाक कुरेशी तर सचिवपदी अशोक लोणीकर, कार्याध्यक्षपदी जलील पठाण ,उपाध्यक्ष रमेश राचलवार, संघटक मष्णाजी बाजगीरे, सहसचिव बालाजी दमकोंडवार, कोषाध्यक्ष शाकेर काझी, प्रसिद्धी प्रमुख ज्ञानेश्वर राजूरे, काशीनाथ इंदुरे, सदस्य गणेश अकुलवार, आदिंची निवड करण्यात आली असुन पञकार संंघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.गणेश जोशी व जिल्हाकार्याध्यक्ष बाळासाहेब पांडे यांच्याहस्ते निवडीचे नियुक्ती पञ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस भालचंद्र तिडके, पञकार अजित पवार , केशव रापतवार, बाबुराव वाघमारे, सतिश वाघमारे, आदि उपस्थित होते.त्यांच्या या निवडीबद्दल सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन सुरेशदादा पंदीलवार, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष गौसखाँ पठाण, उपसरपंच सदाशीव बोयवार, शेतकरी संघटनेचे नेते शिवशंकर पाटील कलंबरकर, युवानेते दिनेशअप्पा आवडके, आदिंनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या,
कार्यक्रमाचे सूञसंचलन पञकार रज्जाक कुरेशी यांनी केले तर मष्णाजी बाजगीरे, यांनी आभार मानले.

Previous articleसोनई महाविद्यालयात वाचन कौशल्य कार्यशाळा संपन्न…
Next article!स्वामी विवेकानंद महाविद्यालयात रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.