Home उतर महाराष्ट्र सार्वजनिक ठिकाणी जनावरे बांधणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल

सार्वजनिक ठिकाणी जनावरे बांधणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल

107

आशाताई बच्छाव

1001102325.jpg

सार्वजनिक ठिकाणी जनावरे बांधणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल
अहिल्यानगर, कारभारी गव्हाणे प्रतिनिधी: बंगाल चौकी परिसरात बस स्टॉपच्या शेडमध्ये, रस्त्यावर सार्वजानिक ठिकाणी सातत्याने जनावरे बांधणाऱ्यावर महापालिकेने अखेर गुन्हा दाखल केला आहे. बंटी श्रीनिवास वायकर (रा. बंगाल चौकी, अहिल्यानगर) असे आरोपीचे नाव आहे. रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणे जनावरे बांधणाऱ्या जनावराच्या मालकावर यापुढे अशाच प्रकारे गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे.
बस स्टॉप व रस्त्यावर सातत्याने जनावरे बांधली जातात
बंगाल चौकी परिसरात बस स्टॉप वर व रस्त्यावर सातत्याने जनावरे बांधली जातात. या ठिकाणी जनावरांना नुकसान पोहोचवणाऱ्या घटनाही वारंवार घडलेले आहेत. महापालिकेने जनावराच्या मालकावर यापूर्वीही कारवाई केलेली आहे. मात्र, महापालिकेच्या दंडात्मक कारवाईला न जुमानता वारंवार रस्त्यावर जनावरे बांधली जात असल्याने अखेर महापालिका प्रशासनाने कठोर पावले उचलत या जनावराच्या मालकावर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
अन्यथा महापालिकेच्या मार्फत दंडात्मक कारवाई
जनावराच्या मालकांनी आपली जनावरे आपल्या स्वतःच्या जागेत सुरक्षित ठिकाणी बांधावीत. रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण होईल, अशा पद्धतीने रस्त्यावर जनावर बांधू नयेत. अन्यथा महापालिकेच्या कोंडवाडा विभागामार्फत दंडात्मक कारवाई केली जाईल. वारंवार सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्यास जनावराच्या मालकांवर गुन्हे दाखल केले जातील, असे आयुक्त यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले आहे.