Home जळगाव साखरपुड्याला गेले अन लग्न लावून आले…

साखरपुड्याला गेले अन लग्न लावून आले…

218

आशाताई बच्छाव

1001100505.jpg

साखरपुड्याला गेले अन लग्न लावून आले…

दरेगाव चे सरपंच गिरीष पाटील यांनी घेतला पुढाकार…

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- लग्न समारंभ आला म्हणजे मुलगी बघणे त्यानंतर पाहुण्यांची वर्दळ, अफाट खर्च मग त्यानंतर साखरपुडा, लग्न पत्रिका छापून वाटप करणे या गोष्टीत वेळ व पैसा खर्च होतो मात्र दरेगाव ता चाळीसगाव येथील सरपंच गिरीष सर्जेराव पाटील यांनी त्यांचे नातेवाईक यांच्या साखरपुडा कार्यक्रम साठी गेले असता मुलीकडील लोकांना थेट साखरपुड्यातच लग्न करा असा प्रस्ताव मांडला असता दोन्ही कडील लोकांना ते मान्य झाले आणि साखर पुड्यातच लग्न सोहळा संपन्न झाला.
दत्तात्रेय निवृत्ती कडलक राहणार दरेगाव तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव यांचे ज्येष्ठ चिरंजीव उमेश आणि
चिकलठाण तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद अनिता व अरुण पतंगराव चव्हाण यांची सुकन्या देवयानी यांचा साखरपुडा कार्यक्रम ठरलेला असल्याने ठराविक नातेवाईक मंडळी व दरेगाव चे सरपंच गिरीष पाटील हे चिकलठाण येथे गेले होते सरपंच गिरीष पाटील यांनी साखरपुड्यामध्ये विवाह उरकून घ्या असा प्रस्ताव ठेवल्यावर सर्वांनी मान्य करून त्याच दिवशी विवाह संपन्न झाला.
यामुळे परिसरात हा विवाह सोहळा चर्चेचा विषय ठरून वधू व वरा कडील मंडळींचे कौतुक होत आहे.
यावेळी मुलीचे काका रामकिसन चव्हाण, कुसुम राम किसन चव्हाण, मुलाचे मामा प्रवीण आबासाहेब मोरे, मामी एडवोकेट स्मिता प्रवीण मोरे, सूर्यकांत मोरे, ज्योती मोरे, बाबा आबासाहेब यादवराव मोरे, मुलाचे काका उत्तमराव कडलक, नानासाहेब कडलक, रोहिणी कडलक, राजेंद्र वाघ, महाले सर, साळुंके बाबा, दिनेश मोरे, यशवंत आबाजी फोपसे, विकास चव्हाण, राजश्री चव्हाण, वैशाली फोपसे, अभिजीत फोपसे, वर्षा फोपसे आदी वऱ्हाडी उपस्थित होते.

Previous articleशेतक-यांच्या प्रश्नासाठी लोकविकास संघटनेचे आंदोलन
Next article31 डिसेंबर रोजी गडकिल्ल्यांवर पार्ट्या करणाऱ्यांवर कार्यवाही करावी सह्याद्री प्रतिष्ठानचे पोलीस निरीक्षकांना निवेदन.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.