Home जळगाव 31 डिसेंबर रोजी गडकिल्ल्यांवर पार्ट्या करणाऱ्यांवर कार्यवाही करावी सह्याद्री प्रतिष्ठानचे पोलीस निरीक्षकांना...

31 डिसेंबर रोजी गडकिल्ल्यांवर पार्ट्या करणाऱ्यांवर कार्यवाही करावी सह्याद्री प्रतिष्ठानचे पोलीस निरीक्षकांना निवेदन.

104

आशाताई बच्छाव

1001100518.jpg

31 डिसेंबर रोजी गडकिल्ल्यांवर पार्ट्या करणाऱ्यांवर कार्यवाही करावी सह्याद्री प्रतिष्ठानचे पोलीस निरीक्षकांना निवेदन.

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान गेली अनेक वर्ष महाराष्ट्रातील अनेक गड किल्ल्यांवर संवर्धन कार्य करत असून गडकिल्ल्यांचे पावित्र्य जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत
या गडकिल्ल्यांवर दरवर्षी ३१ डिसेंबर रोजी काही ठराविक पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करणारे लोक दारू मटणाच्या पार्ट्यांचे आयोजन करून त्या ठिकाणी धिंगाणा घालण्याचे काम करीत असतात यामुळे गड किल्ल्यांचे पावित्र्य भंग होते
चाळीसगाव तालुक्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या किल्ले राजदेहरे, किल्ले कन्हेरगड, किल्ले मल्हारगड, या ठिकाणी किल्ल्यांच्या पायथ्याला दिनांक 31 डिसेंबर 2024 रोजी पोलीस गस्त ठेवावी तसेच या ठिकाणी दारू मटणाच्या पार्ट्या करताना कोणी आढळून आल्यास त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. या मागणीचे निवेदन चाळीसगाव सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने ग्रामीण पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले.
यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे केंद्रीय उपाध्यक्ष दिलीप घोरपडे, जिल्हाध्यक्ष रणजीत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सचिन पाटील, तालुकाप्रमुख गणेश पप्पू पाटील, बाळासाहेब सोनवणे, जयवंत शेलार, ललित अशोक चौधरी, दर्शन चौधरी, पैलवान सचिन पाटील, बबलू चव्हाण, मयूर भागवत, संजय ठाकूर, संजय पवार, मुकुल भागवत, नृतेश भागवत, धनंजय कुलथे
आदी उपस्थित होते.

Previous articleसाखरपुड्याला गेले अन लग्न लावून आले…
Next articleअहिल्यानगरवर व नेवासा तालुक्यात धुक्याची चादर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.