आशाताई बच्छाव
बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मयुरी बांगर यांचे अन्न पाणी त्याग उपोषण सुरू; वाल्मीक कराड वरील खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी
मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा
बीड दि.३० डिसेंबर २०२४ रोजी जिल्ह्यातील केज तालुक्यात मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या व खंडणी प्रकरणी वाल्मीक कराड यांच्यावर राजकीय द्वेषातून दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घ्यावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय समोर मयुरी बांगर यांनी आज सोमवार दि. ३० डिसेंबर सकाळपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना कठोर शासन झाले पाहिजे, हे आमचं स्पष्ट मत आहे. परंतु बीड जिल्ह्यामध्ये दोन जातीमध्ये काही समाजकंटक जाणून बुजून बदनामी करण्याच्या उद्देशाने कट- कारस्थान करीत आहेत. त्यामुळे मी सौ. मयुरी विजयसिंह बांगर दि.३० डिसेंबर २०२४ रोजी पासून जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे शांततेच्या मार्गाने संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार संपूर्ण अन्न, पाणी त्याग अमरण उपोषण करीत आहे. याची दखल घेऊन वाल्मीक कराड यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्यावे, सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी असे म्हटले आहे.






