Home वाशिम नवनिर्माण फाऊंडेशनच्या राज्यस्तरीय ‘यादें रफी गीत स्पर्धेला’ रसिकांचा प्रचंड प्रतिसाद

नवनिर्माण फाऊंडेशनच्या राज्यस्तरीय ‘यादें रफी गीत स्पर्धेला’ रसिकांचा प्रचंड प्रतिसाद

145

आशाताई बच्छाव

1001100431.jpg

नवनिर्माण फाऊंडेशनच्या राज्यस्तरीय ‘यादें रफी गीत स्पर्धेला’ रसिकांचा प्रचंड प्रतिसाद
महिला गटातून कु. लाजरी भुरे तर पुरूष गटातून मलंग शाह यांना प्रथम पुरस्कार
वाशिम, गोपाल तिवारी ब्युरो चीफ- स्वर्गीय गायक स्व. मोहम्मद रफी यांच्या जयंतीनिमित्त शनिवार, २८ डिसेंबर रोजी नवनिर्माण फाऊंडेशनच्या वतीने स्थानिक स्वागत लॉन येथे आयोजित ’यादें रफी गीत स्पर्धेला’ रसिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.या स्पर्धेत महाराष्ट्रासह इतर राज्यातून आलेल्या स्पर्धकांसह महिला व पुरूष प्रेक्षकांची प्रचंड गर्दी होती.
कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी समाजसेवक राजाभैया पवार तर उद्घाटक म्हणून राहुल तुपसांडे यांनी उपस्थिती लाभली. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष अशोक हेडा, राजु पाटील राजे, सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी संग्राम जगताप, जेष्ठ समाजसेवक वसंतराव धाडवे, दिलीप जोशी, मिठुलाल शर्मा, अनिल केंदळे, भगत धामणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कानडे इंटरनॅशनल स्कुलच्या संचालीका सौ. ज्योती विजय कानडे यांनी तसेच सर्व प्रमुख मान्यवरांनी दिपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून कार्यक्रमाचे विधिवत उद्घाटन केले. स्पर्धेला परिक्षक म्हणून डॉ. प्रा. राजेश उमाळे अमरावती, सौ. सरिता हनुवंते, अमरावती यांची उपस्थिती लाभली.
स्पर्धेच्या प्रारंभी नवनिर्माण फाऊंडेशनचे अध्यक्ष श्याम बढेल व सर्व सदस्यांनी मिळून श्री श्री रविशंकर यांचे जय गुरू ओंकारा हे भजन गावून कार्यक्रमात भक्तिमय वातावरणाची निर्मिती केली. स्पर्धेमध्ये स्पर्धकांनी गायीलेल्या तुम्हारे झुल्फो के साये में, ये दिल तुम बिन कही लगता नही, भर दे झोली मेरी या मोहम्मद, सांझ हो तुम आवाज तुम, मैं तेरे ईश्क में मर ना जाऊ, तेरी आँखों के सिवा दुनिया में, रोशन तुम्ही से दुनिया, मोरनी बागा में बोले, पिया बावरी, सत्यम शिवम सुंदरम, एक राधा एक मिरा, कान में झुमका, ओ नन्हे से फरिश्ते, बिल्लो रानी, तुमने मुझे देखा असे अनेक दर्जेदार गीतांना प्रेक्षकांनी प्रचंड टाळ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
पुरूष गटातून स्पर्धेचे पहिले पारितोषिक २१००१ रुपये मलंग शाह अकोला, दुसरे पारितोषिक १५००१ रुपये तनिश गजभिये नागपूर, तिसरे पारितोषिक ११००१ रुपये यश देहदडे अमरावती यांनी पटकाविले. महिला गटातून पहिले पारितोषिक २१००१ रुपये कु. लाजरी भुरे नागपूर, दुसरे पारितोषिक १५००१ रुपये कु. रूपाली भावसार जबलपूर, तिसरे पारितोषिक ११००१ रुपये सौ. मनिषा गव्हाणे नागपूर यांनी मिळविले. तर विशेष ज्युरी पुरस्कार ५००१ रुपये सौ. अंजली बामनेट अकोला, बेस्ट क्लासिकल पुरस्कार ५००१ रुपये गोपाल पिपरैया भोपाल, लता मंगेशकर स्मृति पुरस्कार ५००१ रुपये कु. चैताली जाधव छ. संभाजीनगर, श्रोते प्रोत्साहनपर पुरस्कार ५००१ रुपये पियुषपाल चिंचोळकर आकोट, तसेच वाशिमच्या स्थानिक कलाकारांगधून व्हाईस ऑफ वाशिम पुरूष पारितोषिक ५००१ रुपये महेश बारटक्के तर व्हाईस ऑफ महिला पुरस्कार ५००१ रुपये कु. क्षितीजा लोंढे यांना देण्यात आला. तसेच दिव्यांग स्पर्धकांमधून प्रथम पुरस्कार ८००१ रुपये सौ. पुजा शेंद्रे यवतमाळ यांना देण्यात आला.
या कार्यक्रमात बालगटात प्रथग पारितोषिक ७००१ रुपये मनिष वरघट यवतमाळ, व्दितीय पारितोषिक ६००१ रुपये कु. भक्ति पिसे वाशिम तर तृतीय पारितोषिक ५००१ रुपये सुदर्शन कांबळे वाशिम यांना प्रदान करण्यात आले. सोबतच स्पर्धकांना प्रमाणपत्र व विशेष शिल्ड देण्यात आले. तसेच स्पर्धेत प्रत्येक गटातून प्रथम आलेल्या स्पर्धकांना सौ. सुनिता नारायण मसरे यांच्याकडून स्व. चि. निमिष नारायण मसरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ तबला संच देण्यात आले. तसेच स्पर्धेत ११ स्पर्धकांना प्रोत्साहनपर पुरस्कार व प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमात वाद्यवृंदाची भूमिका रवि डोंगरदिवे, अंकुश आंबटपुरे, कुलदिप चावरे, राजदिप चावरे, पिंटु ठाकरे अमरावती यांच्या संचने उत्कृष्टरित्या पार पाडली. कार्यक्रमाचे बक्षिस वितरण हुकुम तुर्के, गिरीष शर्मा, राजाभैया पवार, सावनसिंह ठाकुर, मुकेशसिंह ठाकुर, दिपक भांदुर्गे, रवि भांदुर्गे, राजु जानीवाले, श्रीमती रंजना पारसकर, सौ. सुनिता मसरे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी पोलिस प्रशासन व कपिल सारडा यांच्या चमुने चोख बंदोबस्त ठेवला. विजयराजे जाधव चांडस यांनी कार्यक्रमात आलेल्या सर्व स्पर्धकांसाठी तसेच आमंत्रित पाहुण्यांसाठी जेवणाची व्यवस्था केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविनाश मारशेटवार यांनी केले तर संचालन कु. वैष्णवी बढेल, कु भुमिका बढेल यांनी केले व आभार प्रदर्शन संस्थेचे अध्यक्ष श्याम बढेल यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  नवनिर्माण फाऊंडेशनचे अध्यक्ष श्याम बढेल, मनोहर मानतकर, महादेव हरकळ, एन.जी. मसरे, जितु बढेल, लक्ष्मण बढेल, मनोज बढेल, तोताराम बढेल, रूपेश बढेल, रोहित बढेल, उमेश मोहळे, पवन शर्मा तसेच समस्त नवनिर्माण फाऊंडेशन ग्रुपने परिश्रम घेतले.

Previous articleहिंगोली जिल्ह्यातील न.प निवडणूक प्रक्रियेला राजकिय मोर्चे बांधण्यासाठी नेते एकवटले
Next articleयुवासेनेने उचलला नगर परिषद शाळेतील पाच गरजु विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चाचा भार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.