आशाताई बच्छाव
जाफराबाद एस. टी. बस स्थानक खाजगी वाहनधारकांच्या विळख्यात
जाफराबाद तालुका प्रतिनिधी – मुरलीधर डहाके
दिनांक 30/12/2024
सविस्तर वृत्त असे की जाफराबाद येथील एस. टी.महामंडळा समोरील बाजूस खाजगी वाहने उभी करुन बस स्थानकात जाऊन प्रवाशांना बोलून खाजगी वाहनात बसवितात. अशी अवैध्य रित्या वाहतूक करतात. बस स्थानका पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलीस स्टेशन कडून कुठलीच कारवाई केली जात नाही. ही एक आश्चर्याची गोष्ट आहे असे जाफराबाद बस स्थान येथिल प्रवाशी बोलू लागले आहेत. पोलिसांचा खाजगी वाहन धारकावर काहीच वाचक राहिलेला नाही असा नागरिकांमधून सुर एकावयास मिळत आहे. तरी पोलिस प्रशासनाने कठोर नियम लागू करावा व खाजगी वाहन धारकावर कठोर कार्यवाही करावी. आणि प्रवाशांची गैर सोय होणार नाही याची काळजी घ्यावी अशी मागणी जाफराबाद शहर आणि तालुक्यातील नागरीक करीत आहे.
एवढेच नाही तर पोलिसांची गाडी बस स्थान समोर असताना सुध्दा खाजगी वाहन धारक भितांना दिसत नाहीत.
अवैध्य वाहतूक करणारे वाहने नादुरुस्त असतात त्यामूळे अपघात होण्याची सुध्दा दाट शक्यता आहे.






