Home बुलढाणा सिंदखेड राजा तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याची चार महिन्यांपासून बदली; मात्र रूजू होण्यासाठी टाळाटाळ...

सिंदखेड राजा तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याची चार महिन्यांपासून बदली; मात्र रूजू होण्यासाठी टाळाटाळ तात्काळ रूजू न झाल्यास होणार कारवाई…..

95

आशाताई बच्छाव

1001095596.jpg

सिंदखेड राजा तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याची चार महिन्यांपासून बदली; मात्र रूजू होण्यासाठी टाळाटाळ तात्काळ रूजू न झाल्यास होणार कारवाई…..
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :- सिंदखेड राजा तहसील कार्यालयातील
कर्मचारी एस डी बंगाळे सहा महसूल अधिकारी यांची बदली दिनांक १२/०८/२०२४ रोजी म्हणजेच चार महीन्यापूर्वी मेहकर तहसील कार्यालयात झाली असूनही अद्याप हा कर्मचारी मेहकर तहसील कार्यालयात रूजू न झाल्याने तहसीलदार अजित दिवटे यांनी २४ डिसेंबर रोजी बगाळे यांनी तात्काळ
मेहकर तहसील कार्यालयात रूजू होण्याचा आदेश केला आहे. रूजू न झाल्यास सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास आपणा विरुध्द म.ना.से. वर्तणूक नियम १९७९ नुसार कार्यवाही करण्याचे आदेशात म्हटले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की. एस डी बंगाळे यांची बदली मा जिल्हाधिकारी बुलडाणा, पदस्थापना करमणुक कर निरीक्षक, तहसिल कार्यालय मेहकर येथे रुजु होण्याकरीता व कार्यालयीन कामकाज सुरळीत होण्यासाठी केली असून अद्याप या कर्मचाऱ्यांनी पदस्थापना झालेल्या ठिकाणी रूजू झाला नसल्याची माहिती पुढे आली आहे.

देऊळगाव राजा येथील तहसील कर्मचारी श्री. एन. एम. खरात सहा.मह. अधिकारी पुरवठा निरीक्षक (अतिरिक्त स्वरूपात) त्यांच्या कडे हा पदभार सोपवण्यात आला असून. सोमवारी ते तहसील कार्यालयातील पदभार स्वीकारणार असल्याची माहिती समोर आली आहे.