Home बुलढाणा अशोक उगले या शेतकऱ्याचे विनंतीपूर्वक आवाहन

अशोक उगले या शेतकऱ्याचे विनंतीपूर्वक आवाहन

149

आशाताई बच्छाव

1001095588.jpg

अशोक उगले या शेतकऱ्याचे विनंतीपूर्वक आवाहन

बुलढाणा ( संजीव भांबोरे)बुलढाणा जिल्ह्यातील, सिंदखेड राजा तालुक्यातील किनगाव राजा येथूनच जवळ असलेल्या पांगरी उगले गावातील
श्री अशोक जयाजी उगले रा. पांगरी उगले येथील रहिवाशी असलेल्या या शेतकऱ्याने बुलढाणा अर्बन को ऑफ क्रेडिट सोसायटी लि बुलढाणा शाखा वेअर हाऊस दुसरबीड येथे दिनांक १४/११/२२०२२ रोजी शेतमाल ठेवला होता. याच ठेवीची पावती क्रमांक 584665 हि १०० पोते सोयाबीन ठेवण्याची पावती काढलेली होती. परंतू सदर पावती ही त्यांच्याकडून नकळतपणे हरवली आहे. अजूनपर्यंत ही पावती त्यांना सापडली नाही.
त्यामुळे श्री अशोक उगले यांची मोठी अडचण झाली आहे. आपला शेतमाल ठेवीची मुख्य पावती च हरवल्याने ते मोठे हतबल झाले आहे.
सदर पावती ही कोणाला सापडल्यास किंवा आढळल्यास ७०२०५०७३९३ या क्रमांकावरून फोन करून ती परत करण्यात यावी अशी विनंती पंचक्रोशीतील नागरिकांना अशोक उगले यांचेकडून कऱण्यात येत आहे.