Home जालना अकोला येथील युवक -युवती संमेलनासाठी प्रा. राजेंद्र वैद्य यांचे मार्गदर्शक म्हणून निवड

अकोला येथील युवक -युवती संमेलनासाठी प्रा. राजेंद्र वैद्य यांचे मार्गदर्शक म्हणून निवड

64

आशाताई बच्छाव

1001089583.jpg

अकोला येथील युवक -युवती संमेलनासाठी प्रा. राजेंद्र वैद्य यांचे मार्गदर्शक म्हणून निवड
जाफराबाद जालना प्रतिनिधी- मुरलीधर डहाके
दिनांक 27-12-2024
सविस्तर वृत्त असे की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवामध्ये 3 व 4 जानेवारी रोजी अकोला येथे युवक- युवती संमेलन होणार आहे. या महोत्सवासाठी जाफराबाद येथीलअखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे जालना जिल्ह्याचे प्रमुख राजेंद्र वैद्य यांची विशेष मार्गदर्शन म्हणून निवड झाली आहे. तुकडोजी महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव मोठ्या उत्साहाने अकोला येथे दरवर्षी साजरा करण्यात येतो. यामध्ये राज्यभरातून कार्यकर्ते व विचारवंत सहभागी होत असतात.या महोत्सवात सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे युवक-युवती संमेलन होते.यामध्ये हजारो युवक सहभागी होतात. गेल्या 30 वर्षापासून श्री गुरुदेव सेवा मंडळाचे माध्यमातून ग्रामगीता संत तत्त्वज्ञान यावर ग्रामगीतेचे अभ्यासक राजेंद्र वैद्य यांची निवड झाली आहे .4 जानेवारी रोजी ते अकोला येथे जाऊन मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या निवडीबद्दल सुनील भोसले निवृत्ती दिवटे, गोपाळ लोखंडे, संदीप सोळंके, प्रा. विनोद सोळंके, ज्ञानेश्र्वर निकम आदींनी अभिनंदन केले आहे. तसेच जाफराबाद तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.