Home जालना जालना जिल्हा भाजपा सदस्यता नोंदणी अभियान कार्यशाळा संपन्न

जालना जिल्हा भाजपा सदस्यता नोंदणी अभियान कार्यशाळा संपन्न

119

आशाताई बच्छाव

1001087881.jpg

 

जालना जिल्हा भाजपा सदस्यता नोंदणी अभियान कार्यशाळा संपन्न

जिल्ह्यात पाच लाख सदस्य नोंदणी करणार – माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे

 

जालना (दिलीप बोंडे ब्युरो चीफ) : – आज दिनांक 26 डिसेंबर 2024 रोजी भारती लॉन्स, बालाजी चौक, जालना येथे माजी केंद्रीय राज्यमंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा जालना जिल्हा सदस्यता नोंदणी अभियान कार्यशाळा आयोजीत करण्यात आली होती. कार्यक्रमाची सुरुवात भारत माता, स्व.अटल बिहारी वाजपेयी व विर बाल दिवस म्हणून बाबा फतेह सिंग व बाबा जोरावर सिंग यांच्या प्रतिमांचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे म्हणाले की, भारतीय जनता पार्टी जिल्हा जालना जिल्ह्यात सदस्यता नोदणी अभियानांतर्गत पाच लाख सदस्य नोंदणी करणार आहे. जालना जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी आपल्या मेहनतीने विधानसभा निवडणुकीत मोठे यश संपादन केले. याच ऊर्जा आणि एकजुटीच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्येही यश मिळवण्यासाठी प्रत्येक घराघरात पोहोचण्याचे काम या सदस्यता अभियानाद्वारे करावे लागेल. देशभरात चालू असलेल्या भाजप सदस्यता नोंदणी अभियानाच्या धर्तीवर जालना जिल्ह्यातील अभियानाची सुरुवात या कार्यशाळेद्वारे करण्यात आली. मंडळ स्तरावर कार्यशाळा आयोजित करून सदस्य नोंदणी करावी आणि अधिकाधिक लोकांना भाजपशी जोडण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी योगदान द्यावे. भारतीय जनता पार्टी संघटनात्मक काम करणारी पार्टी असून लोकसभेमध्ये दोन सदस्य ते  आज देशातील एक नंबरचा पक्ष त्याचबरोबर जगभरातील सर्वात मोठा सदस्य असणारा पक्ष अशी वाटचाल करणाऱ्या भाजपाचे स्वप्न अटलजींनी पाहिले होते ते आज पूर्ण होत आहे .

Previous articleहमजा किराणा दुकानाच्या गोदामास आग, लाखोचे नुकसान
Next articleभाजपा जालनाच्या वतीने भारतरत्न श्रध्देय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.