Home वाशिम ख्रिसमस निमित्त चर्च ऑफ द नॅझरीन युथचे महारक्तदान शिबीर उत्साहात

ख्रिसमस निमित्त चर्च ऑफ द नॅझरीन युथचे महारक्तदान शिबीर उत्साहात

110

आशाताई बच्छाव

1001082080.jpg

ख्रिसमस निमित्त चर्च ऑफ द नॅझरीन युथचे महारक्तदान शिबीर उत्साहात
वाशिम, गोपाल तिवारी ब्युरो चीफ- भगवान येशु ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा होणार्‍या ख्रिसमस (नाताळ) या पवित्र सणाच्या निमित्ताने समाज आणि देशाप्रती सामाजीक बांधीलकी म्हणून चर्च ऑफ द नॅझरीन युथच्या वतीने स्थानिक जुन्या नगर परिषदेमागील जुन्या नॅझरीन चर्चमध्ये सोमवार, २३ डिसेंबर रोजी भव्य महारक्तदान शिबीर उत्साहात पार पडले.
याप्रसंगी आयोजीत कार्यक्रमाला चर्चचे पालक रेव्ह. रिबेका सुतार यांच्यासह पंचमंडळाचे सभासद सुभाष सुतार, अनिल अघमकर व मंडळीमधील सक्रिय तरुण वैभव खरे, सचिन सुतार, शारोन खंडारे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी सर्वांनी येशु ख्रिस्त यांचे वचन म्हटले. त्यानंतर रक्तदान शिबीरास प्रारंभ करण्यात आला. यावेळी तब्बल २५ तरुणांनी स्वेच्छेने रक्तदान करुन देशाप्रती आपल्या कर्तव्याचे पालन केले. रेव्ह रिबेका सुतार यांनी ख्रिसमस निमित्त आपल्या कर्तव्याप्रती जागरुक राहून आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराबद्दल चर्च ऑफ द नॅझरीन युथच्या युवकांचे कौतूक केले. ते म्हणाले की, रक्त हा मनुष्याला जिवित ठेवणारा महत्वाचा घटक असून रक्त हे कोणत्याही प्रयोगशाळेत तयार होत नाही. दवाखान्यात गंभीर प्रसंगी रुग्णांना तातडीने रक्तपुरवठा करावा लागतो. तसेच रक्ताच्या अनेक आजारामध्येही रुग्णांना नियमित रक्त द्यावे लागते. अशावेळी शासकीय रक्तपेढीत रक्त उपलब्ध नसल्यास रक्ताअभावी रक्त दगावण्याची देखील भिती असते. त्यामुळे रक्ताचा मुबलक साठा राहावा या दृष्टीने प्रत्येक स्वस्थ व्यक्तीने तीन महिन्यातून एकदा तरी रक्तदान करावे. अर्थातच रक्तदानाच्या या पवित्र आणि ऐच्छिक कार्यामागे आपण इतरांचा जीव वाचवू शकतो ही भावना मनाला अमृतमय समाधान देणारी आणि स्वत:ला ईश्वराकडे नेणारी आहे. त्यामुळे रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असून युवकांनी आपले ऐच्छिक रक्तदान करुन रक्तदानाच्या या राष्ट्रीय कार्यात आपली सामाजीक जबाबदारी उचलावी असेही आवाहन त्यांनी केले. रक्त संकलनासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सामान्य रुग्णालयाचे रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. सोहेल परवेल, रक्तपेढी वैज्ञानिक एस.एस. स्वामी, जी. वैद्य, पीआरओ एस.के. दंडे, अधिपरिचारीका दत्त कांगणे, रक्तकेंद्र परिचर सुनिल सावके, वाहनचालक पुरुषोत्तम चव्हाण आदींनी सहकार्य केले. तर शिबीराच्या यशस्वीतेसाठी चर्च ऑफ द नॅझरीन युथच्या सर्व युवकांनी अथक परिश्रम घेतले.

Previous articleशेतकऱ्यांना नुकसान होईल, अशी कोणतीही कृती साखर कारखान्यांनी करू नये : जिल्हाधिकारी
Next articleसाकोलीत हैवान मानवांचा मूक प्राण्यांवर राक्षसी अत्याचार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.