Home बुलढाणा मोताळ्यात मोर्चा धडकला ! – परभणी प्रकरणाचे पडसाद ! – शिव-फुले-शाहू- आंबेडकर...

मोताळ्यात मोर्चा धडकला ! – परभणी प्रकरणाचे पडसाद ! – शिव-फुले-शाहू- आंबेडकर अनुयायांचा निषेध ! – जयश्री – शेळकेंनी व्यक्त केल्या तीव्र भावना !

96

आशाताई बच्छाव

1001080665.jpg

मोताळ्यात मोर्चा धडकला ! – परभणी प्रकरणाचे पडसाद ! – शिव-फुले-शाहू- आंबेडकर अनुयायांचा निषेध ! – जयश्री – शेळकेंनी व्यक्त केल्या तीव्र भावना !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :- मोताळा तालुका परभणी येथील पोलिसांच्या अमानुष मारहाणीत भिमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला, बीड मधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निघृणपणे हत्या करण्यात आली. या दोन्ही घटनेतील मुख्य आरोपींना आणि सूत्रधाराला कठोरात कठोर शिक्षा व्हावी तसेच गृहमंत्री अमित शाह यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी
केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ शिव-फुले- शाहू-आंबेडकर अनुयायांच्या वतीने आज मोताळा तहसील कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते ! जयश्रीताई शेळके यांनी सहभागी होऊन तीव्र भावना व्यक्त केल्या. या मोर्चाला प्रचंड संख्येने महिला व पुरुष बांधवांनी उपस्थित राहत निषेध व्यक्त केला.
यावेळी मोताळा तहसीलदार हेमंत पाटील यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदनावर डि.टी. इंगळे, अरुणभाऊ डोंगरे, लक्ष्मणराव गवई, भीमराव शिरसाठ, निळकंठ वानखेडे, साहेबराव डोंगरे, अनिल खराटे, अॅड. सतीषचंद्र रोठे, संतोष मेढे, कैलास खराटे, संदीप मोरे, संदीप वानखेडे, विनोद धुरंधर, विनोद सावळे, अजय खराटे, जितेंद्र खराटे, बाळासाहेब अहिरे, शेख साबु, एस.पी. अहिरे, विजय सुरडकर, सँडी मेढे, राजु वाघ इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Previous articleनायलॉन मांजा अडकल्याने गळा कापला गेल्याने पडले पाच टाके
Next articleशेतकऱ्यांना नुकसान होईल, अशी कोणतीही कृती साखर कारखान्यांनी करू नये : जिल्हाधिकारी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.