Home जालना “जालना शहर महानगरपालिकेमार्फत शहरात एकल प्‍लास्‍टीक वापर बंदी (Single Use Plastic) बाबत...

“जालना शहर महानगरपालिकेमार्फत शहरात एकल प्‍लास्‍टीक वापर बंदी (Single Use Plastic) बाबत कारवाई”

94

आशाताई बच्छाव

1001077511.jpg

“जालना शहर महानगरपालिकेमार्फत शहरात

एकल प्‍लास्‍टीक वापर बंदी (Single Use Plastic) बाबत कारवाई”

यापुढे शहरात नियमितपणे कार्यवाही करण्‍यावर भर – सहायक आयुक्‍त

जालना दिलीप बोंडे ब्युरो चीफ 

शहरात एकल प्‍लास्‍टीक (Single Use Plastic) साठाबाबत माहिती मिळाल्‍यानुसार जालना शहर महानगरपालिकेमार्फत आज दिनांक २३.१२.२०२४ रोजी दुकानदार/आस्‍थापना गायत्री प्‍लास्‍टीक, जालना यांच्‍याकडे प्‍लास्‍टीक आढळुन आल्‍याबाबत त्‍यांच्‍यावर १०,०००/- अक्षरी दहा हजार रुपये दंड व ६५० किलो प्‍लास्‍टीक जप्‍त करण्‍यात आले. सदरच्‍या कार्यवाहीमध्‍ये जालना मनपाच्‍या सहायक आयुक्‍त श्रीमती सुप्रिया चव्‍हाण, स्‍वच्‍छता विभाग प्रमुख पंडीत पवार, स्‍वच्‍छता निरीक्षक श्री. अशोक लोंढे, श्री. शोएब खान व इतर कर्मचारी उपस्थित होते.

करिता जालना शहर महानगरपालिकेमार्फत शहरातील सर्व आस्‍थापना/दुकानदार व नागरिक यांना  आवाहन करण्‍यात येते की, शासनाकडुन एकल प्‍लास्‍टीकचा (Single Use Plastic) वापर, वाहतुक, विक्री व साठाबाबत बंदी असुन एकल प्‍लास्‍टीकचा वापर, विक्री वाहतुक व साठा करु नये याबाबत सहकार्य करावी ही विनंती.

जालना शहर महानगरपालिका व महाराष्‍ट्र प्रदुषण मंडळामार्फत याबाबत नियमितपणे तपासणी/पाहणी करण्‍यात आहे.  प्‍लास्‍टीक वापरकर्त्‍यांवर दंडनीय कार्यवाही करुन गुन्‍हा नोंद करण्‍याबाबतची देखील कार्यवाही करण्‍यात येणार आहे.  तसेच शहरात ज्‍याठिकाणी प्‍लास्‍टीक वाहतुक, विक्री, वापर व साठा होत असेल तर याबाबत जालना मनपास अवगत करुन सहकार्य करावे.

 

Previous articleधवल क्रांतीच्या उद्योग क्षेत्रातील संधी समस्या व उपाय या विषयावर प्रोफेसर सुरेश लांडगे यांचे व्याख्यान संपन्न
Next articleमुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत टिंवकल स्टारचे यश
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.