आशाताई बच्छाव
केज तालुक्यातील आडस – होळ रस्त्यावर तीन महिन्याचे अर्भक सापडले
मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा
बीड/केज दि.२३ डिसेंबर २०२४ रोजी केज तालुक्यातील आडस होळ दरम्यान जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला एका उसाच्या शेतात तीन महिन्याचे पुरुष जातीचे जिवंत अर्भक आढळून आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दि.२३ डिसेंबर रोजी सकाळी ०७:०० वाजण्याच्या सुमारास शेतात जात असलेल्या एका शेतकऱ्याला उसाच्या पाचटाच्या शेतात कळ्या व लाल रंगाच्या चौकटी रघ पांघरून घातलेले एक तीन महिने वयाचे पुरुष जातीचे जिवंत अर्भक आढळून आले. शेतकऱ्याने ही माहिती युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्य पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांना दिली. माहिती मिळतात पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांनी पोलीस उपनिरीक्षक राहुल शेंडगे आणि पोलीस खेडकर व महिला पोलीस गाडेकर यांना घटनास्थळी रवाना केले. घटनास्थळी रवाना झालेल्या पोलिसांनी सदर अर्भक ताब्यात घेऊन त्याला स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व महाविद्यालय अंबाजोगाई येथे उपचारासाठी दाखल केले आहे. सदर अर्भक हे कोणाचे आहे त्याची माता कोण आहे व त्याला या अवस्थेत कोणत्या कारणामुळे टाकून गेली याचा शोध घेणे गरजेचे आहे, तरी पुढील तपास पोलीस करत आहेत.






