आशाताई बच्छाव
अँड.मनोज संकाये यांच्या मागणीला यश; नगरपालिकेकडून ट्रान्सपोर्ट रोडचे काम प्रगतीपथावर
मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा
परळी दि. १३ डिसेंबर २०२४
गेल्या अनेक वर्षांपासून परळीकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला रेल्वे उड्डाणपुलाखाली ट्रान्सपोर्ट रोडचे काम नगरपालिकेकडून प्रगतीपथावर चालू आहे याची पाहणी आज त्यांनी केली. यावेळी त्यांच्यासोबत शिवाजीनगर येथील रहिवाशी रिपाईचे ज्येष्ठ नेते भीमराव पौळे, ॲड. दीपक शिंदे उपस्थित होते.
ट्रान्सपोर्ट रोडचे काम गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होते. या मागणीसाठी त्यांनी अनेक वेळा नगरपालिका प्रशासन, तहसील प्रशासन आणि जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून निवेदने दिली आणि मागणी पूर्ण करण्यासाठी सतत पाठपुरावा केला. नगरपालिका प्रशासनाने या कामाची दखल घेतली गेल्या दहा दिवसापासून काम सुरू आहे. रोडवर खडी अंथरण्याचे काम सुरू आहे आणि इतर काम लवकर पूर्ण होणार आहे त्यामुळे शिवाजीनगर आणि येथील परिसरातील राहणाऱ्या लोकांचा प्रदूषणाचा त्रास कमी होण्यास मदत होईल. परिसरातील नागरिकांना प्रदूषणामुळे श्वसनाचे, त्वचेचे विकार जडत होते आणि पर्यायाने नागरिकांच्या खिशाला कात्री लागत होती. त्यांनी नगरपालिका प्रशासनाचे काम सुरू केल्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत तसेच नागरिकांनी त्यांनी पाठपुरावा केल्यामुळे व मागणीला यश आल्यामुळे त्यांचे आभार मानले आहेत.






