Home जालना संविधानाच्या तोडफोडीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजीक न्याय विभागाकडून निषेध आरोपीला फासावर देण्याची...

संविधानाच्या तोडफोडीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजीक न्याय विभागाकडून निषेध आरोपीला फासावर देण्याची केली जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

95

आशाताई बच्छाव

1001042057.jpg

संविधानाच्या तोडफोडीचा राष्ट्रवादी काँग्रेस
पार्टी सामाजीक न्याय विभागाकडून निषेध
आरोपीला फासावर देण्याची केली जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी
जालना (दिलीप बोंडे ब्युरो चीफ) ः परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील प्रतिकृती (संविधाना) च्या तोडफोडीचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजीक न्याय विभागाच्या वतीने करण्यात आला असून सदरील आरोपीला फासावर देण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या संदर्भात दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, सोपान  पवार या नराधमाने परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पतुळ्यासमोरील प्रतिकृतीची (संविधान) तोडफोड केली असून या आरोपीला फासावर लटकविण्यात यावे तसेच यामागचा बोलविता धनी कोण याचा तपास करून कडक शासन करावे अशी मागणी देखील निवेदनात करण्यात आली आहे.  निवेदनावर जिल्हाध्यक्ष प्रभाकर घेवंदे यांच्यासह इतरांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Previous articleदत्त जयंती निमित्त वारी उत्सव सोहळ्याचे आयोजन
Next articleमोबाईल पेक्षा ग्रंथ वाचनास प्राधान्य द्या : उपविभागीय अधिकारी  डॉ.श्रीमंत हारकर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.