आशाताई बच्छाव
मातोश्री रमाबाई आंबेडकर सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन.
मुखेड प्रतिनीधी – मनोज बिरादार
मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथील मातोश्री रमाबाई भिमराव आंबेडकर सामाजिक सेवाभावी संस्था मागील ८-९ वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जोपासत असून नेहमीच मानवहितासाठी सामाजिक क्षेत्रात सतत कार्यरत आणि सक्रिय असते.संस्थेच्या माध्यमातून संस्थेने तालुक्यात आज पर्यंत उल्लेखनीय कामगिरी बजावली व बजावत आहे.या मातोश्री रमाबाई भिमराव आंबेडकर सामाजिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश दत्ता सोनकांबळे व सचिव पत्रकार तथा स्वाभिमान भारत वृत्तपत्राचे चे संपादक भारत सोनकांबळे यांच्या माध्यमातून दरवर्षी संस्थेच्या वतीने विवीध स्वरुपाचे सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. त्याच अनुषंगाने दि.६ डिसेंबर २०२४ रोजी बेटमोगरा येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरीनिर्वान दिनिनिमित अभिवादन पर कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.कार्यक्रमाच्या सुरुवातीस भारतीय संविधानाचे निर्माते,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना संस्थेचे सचिव – भारत सोनकांबळे व पत्नी श्वेता भारत सोनकांबळे यांनी महामानवाच्या प्रतिमेस दीप,धूप,व पुष्पमाला अर्पण करून या ऐतिहासिक दिवशी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन केले.






