Home नांदेड तामिळनाडू राज्यातील मदुराई येथील मीनाक्षी हॉस्पिटल ने आयोजित आंतरराष्ट्रीय विष परिषदेत सुप्रसिद्ध...

तामिळनाडू राज्यातील मदुराई येथील मीनाक्षी हॉस्पिटल ने आयोजित आंतरराष्ट्रीय विष परिषदेत सुप्रसिद्ध सर्पदंश तज्ञ डॉ.दिलीप पुंडे यांच्या व्याख्यानास अभूतपूर्व प्रतिसाद.

97

आशाताई बच्छाव

1001028537.jpg

तामिळनाडू राज्यातील मदुराई येथील मीनाक्षी हॉस्पिटल ने आयोजित आंतरराष्ट्रीय विष परिषदेत सुप्रसिद्ध सर्पदंश तज्ञ डॉ.दिलीप पुंडे यांच्या व्याख्यानास अभूतपूर्व प्रतिसाद.

मुखेड/ मनोज बिरादार

नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील जांब येथील मूळचे असलेले डॉ.दिलीप पांडुरंग पुंडे यांनी वैद्यकिय शिक्षण घेतल्यानंतर मोठ्या शहरात दवाखाना थाटून प्रॅक्‍टिस करुन आपला लौकिक वाढवण्याऐवजी मातीशी जोडली गेलेली नाती जपत छोट्याशा मुखेड सारख्या डोंगराळ भाग असलेल्या तालूक्‍याच्या ठिकाणी त्यांनी दवाखाना उभारला.मुखेड या छोट्या तालुक्‍याच्या ठिकाणी वैद्यकिय सेवेला सुरुवात केली.आंतरराष्ट्रीय विष परिषदेचे अध्यक्ष डॉ.गोपाल कृष्णकोन व ऑक्‍सफर्ड विद्यापीठाचे डॉ.डेव्हीड वॉरेल यांनी सुप्रसिद्ध सर्पदंश तज्ञ डॉ.दिलीप पुंडे यांच्या मागील ३०-३५ वर्षांच्या सातत्याने सुरू असलेल्या कार्याची विशेष दखल घेतली व इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठात जागतिक विष परिषदेत त्यांनी सर्पदंश विषयावर भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. नुकतेच तामिळनाडू राज्यातील मदुराई, (तामिळनाडू) येथे आंतरराष्ट्रीय विष परिषदेत (Intox 2024) डॉ दिलीप पुंडे यांच्या व्याख्यानास अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
मीनाक्षी हॉस्पिटल मदुराई, (तामिळनाडू) येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय विष परिषदेत (इंटॉक्स -२०२४) डॉ.दिलीप पुंडे, मुखेड जि.नांदेड यांचे दि.६ डिसेंबर २०२४ रोजी ‘सर्पदंश, विंचुदंश आणि इतर विषारी दंशाचे निदान आणि आजची व उद्याची उपचार पद्धती’ या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. व्याख्यानास अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या व्याख्यानात डॉ. दिलीप पुंडे यांनी भारतातील सर्पदंशाची भिषणता, व्यवस्थापनातील अडचणी आणि उपचार पध्दती, प्रतिबंध यावर सखोल मार्गदर्शन केले. या परिषदेत २० देशांतील वक्ते आणि २५० तज्ञ डॉक्टरांनी सहभाग घेतला. मागील 37 वर्षांत पुंडे हॉस्पिटल येथे ८००० (आठ हजार) सर्पदंश रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले.१९८८ साली या भागात सर्पदंश मृत्यदर २५ % होता तो २०२३-२४ या काळात 0% आहे. या कार्याची आणि व्याख्यानाची जगभरातील वक्ते आणि इतर श्रोत्यांनी प्रशंसा केली आणि अनेक डॉक्टरांसाठी हे कार्य मार्गदर्शक आणि प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले. डॉ.दिलीप पुंडे यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.