Home जालना जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्सवात संपन्न

जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्सवात संपन्न

120

आशाताई बच्छाव

1001026149.jpg

 

जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्सवात संपन्न

 

जालना, दि.6 (जिमाका) : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व युवा कार्यक्रम मंत्रालय भारत सरकार अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद आणि नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय युवा महोत्सव 2024-25 उत्सवात संपन्न झाला.

येथील शासकीय ओद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयोजित जिल्हास्तर युवा महोत्सवाचे उद्घाटन  जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते पार पडले. यावेळी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल जिल्हा नियोजन अधिकारी  सुनिल सूर्यवंशी, शाहीर रामानंद उगले , जिल्हा क्रीडा अधिकारी संजय गाढवे, जिल्हा युवा अधिकारी प्रणित सांगवीकर प्राचार्य आयटीआय कॉलेज प्राध्यापक डॉ. प्रवीण उखळीकर जिल्हा समन्वयक राष्ट्रीय सेवा योजना प्राध्यापक डॉ. सोमीनाथ खाडे क्रीडा अधिकारी डॉ. रेखा परदेशी ,श्रीमती आरती चिल्लारे, क्रीडा मार्गदर्शक सिद्धार्थ कदम, राहुल गायके आदी उपस्थित होते.

या जिल्हास्तरीय  महोत्सवांमध्ये समूह लोकनृत्य ,समूह लोकगीत, कविता लेखन, कथालेखन ,वक्तृत्व स्पर्धा, विज्ञान व तंत्रज्ञान यामधील नव संकल्पना व युथ आयकॉन इत्यादी बाब असून विजयी स्पर्धकांना रोख पारितोषिक प्रमाणपत्र व ट्रॉफी असून यामध्ये प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक  काढले आहे.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुल गायके , किशोर नावकर, अमर लोंढे , प्रा. शाम चव्हाण ,श्री प्रा. सतीश मगरे आदी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले आहे. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले.

Previous articleडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त एक पेन आणि एक वही अभियानास प्रतिसाद
Next articleभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.