आशाताई बच्छाव
गोरेगाव शिवारातील घटना गुन्हा दाखल
हिंगोली (श्रीहरी अंभोरे पाटील ब्युरो चीफ) : सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे एका शेतकर्याने हळद व तुरीच्या पिकात शासनाने प्रतिबंधीत केलेल्या गांजाच्या झाडाची लागवड केली. पोलिसांनी मारलेल्या छाप्यात १ लाख ६६ हजार ७५० रूपयाचे १६ किलो ६७५ ग्रॅम वजनाचे ४२ गांजाची झाडे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील शेत गट क्रमांक ४४८/ अ/१ यामध्ये () गांजाच्या झाडाची लागवड केली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यावरून ५ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या माहितीनुसार शेतामध्ये जाऊन पाहणी केली असता शेतात हळद व तुरीच्या पिकाची लागवड केलेली दिसून आली. हे पथक पाहत पाहत शेताच्या मध्यभागी आले असता त्यांना गांजाच्या झाडाची लागवड केल्याचे दिसून आले.
त्यानंतर पोलिसांनी या शेतामधून १६ किलो ६७५ ग्रॅम वजनाचे १ लाख ६६ हजार ७५० रूपयाचे ४२ गांजाची झाडे उपटून हस्तगत केली. याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विठ्ठल ज्ञानबा खिल्लारी रा.भट कॉलनी गोरेगाव याच्यावर एनडीपीसी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
ही (Ganja plants) कामगिरी जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गजानन बोराटे, किशोर कातकडे, पांडूरंग राठोड, निरंजन नलवार, चालक शिवाजी इंगोले यांनी केली आहे.