Home संपादकीय अपघाताची घटना मी आणि योगायोग, जिव्हाळयाची आपली माणसं!!

अपघाताची घटना मी आणि योगायोग, जिव्हाळयाची आपली माणसं!!

132
0

आशाताई बच्छाव

1000565854.jpg

अपघाताची घटना मी आणि योगायोग,
जिव्हाळयाची आपली माणसं!!
मित्रांनो,मी गेल्या दोन दिवसांपासून सारखा अनुभव घेतोय,या जगात पैसाच सबकुछ नसून माणूसकी धर्म फार मोठा आहे.जिव्हाळयाने जोडली गेलेली आपली आपुलीकीची माणसं हिच माझी खरी धनसंपत्ती आहे.दोन डिसेंबर रोजी माझा अपघात झाल्यानंतर दवाखान्यात घेऊन जा उपचारासाठी धावपळ कर यासाठी युवा मराठा न्यूज चॅनलचा वृत्तसंपादक प्रमोद पवार सारखी धावाधाव करत होता तर रोज तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी घरी येऊन बसतो.त्याशिवाय नाशिकच्या आडगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस उपनिरीक्षक ए.के . गायकवाड साहेब यांनी प्रत्यक्ष घरी येऊन तब्बेतीची विचारपूस करून १०००/- रुपये दिले.सोबत रोझे गावच्या सरपंच सौ. सुमनताई गायकवाड व उपसरपंच नामदेवराव उगले यांनी सुध्दा आस्थेवाईकपणे तब्बेतीची चौकशी केली.त्याशिवाय दहिवाळ येथील स्नेही अतुल पोतदार व कँम्पातील राहुल भोसले यांनी सुध्दा भेट घेऊन हळहळ व्यक्त केली.तर डाँ.मोतीराम चिंध़ा पानपाटील यांनी सुध्दा भेट देऊन तब्बेतीची काळजी घ्यावी म्हणून आवर्जून सांगितले.तर युवा मराठाचे नाशिक ब्युरो चीफ दिलीप चव्हाण यांनी फोन करून उपचारासाठी नाशिकला या म्हणून सांगितले व काही अडचण असल्यास कळवावे म्हणून मोठी सहानुभूती दाखवली.शिवाय युवा मराठाचे भगूर प्रतिनिधी सुदर्शन बर्वे यांनी सुध्दा याच प्रकारचा धीर दिला.त्याशिवाय युवा मराठाचे कळवण तालुका प्रतिनिधी बाळासाहेब निकम व मोकभणगी प्रतिनिधी संभाजी वाघ यांनी सुध्दा आज प्रत्यक्ष भेट घेऊन धीर दिला.त्याशिवाय युवा मराठाचे अकोला (विदर्भ) ब्युरो चीफ सतिश लाहुळकर यांनी १०००/- रुपये पाठवून आपला माणूसकी धर्म जोपासला.तर फक्त मोबाईल व्दारे मैत्री झालेले नवी मुंबईतील कामोठे भागात राहणारे रेल्वे कर्मचारी शिवाजीराव कामोठे यांनी सुध्दा मला २०००/- रुपये पाठवून सहकार्य केले.तस तर मला अपघात झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून युवा मराठाच्या प्रतिनिधी पत्रकार ब्युरो चीफ यांचे फोन आले .हिंमत व धीर देणारे मँसेज आलेत.त्यामुळे मी अक्षरशः भारावून गेलो.जिव्हाळयांची कौटुंबिक सदस्यांसारखी वागणारी आपल्यासारखी माणसं मला भेटलीत.हे मी माझे परमभाग्य समजतो.व आपल्या ऋणातून या जन्मी तरी उतराई होणे शक्य नाही.आपल्या सगळ्यांचे मनःपूर्वक आभार! आज खरी गरज आहे ती, माणसाला माणूस म्हणून समजून घेण्याची.फक्त कामापुरतीच जवळ आलेली माणसं बघूनच आता आपल्याला सुध्दा यापुढे स्वतः मध्ये बदल करावा लागेल हा अनुभव मी अगदी जवळून घेत आहे.
आपलाच
राजेंद्र पाटील राऊत
मुख्य संपादक
युवा मराठा न्यूजपेपर्स अँन्ड वेब न्यूज चॅनल महाराष्ट्र

Previous articleबागलाण मधील नामपूर नगरीत इतिहासात पहिल्यांदा दाउदी बोहरी समाजाचे ५३ वे धर्मगुरू यांचे आगमन
Next articleवैशाली बुद्ध विहार व सुबोध बुद्ध विहार अड्याळ येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here