Home जालना अध्यक्षपदी डॉ. अरुण शंकरराव खैरे तर सचिवपदी डॉ. अर्जुन शेळके यांची एकमताने...

अध्यक्षपदी डॉ. अरुण शंकरराव खैरे तर सचिवपदी डॉ. अर्जुन शेळके यांची एकमताने बिनविरोध

19
0

आशाताई बच्छाव

1001014139.jpg

अध्यक्षपदी डॉ. अरुण शंकरराव खैरे तर सचिवपदी डॉ. अर्जुन शेळके यांची
एकमताने बिनविरोध
बदनापूर,/जालना (दिलीप बोंडे ब्युरो चीफ.)- तालुक्यातील वैद्यकीय सेवा बजावणार्‍या
डॉक्टरांना एकत्रित करणार्‍या डॉक्टर्स असोसिएशनची स्थापना केलेली असून
या असोसिएशनमार्फत विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.
असोसिएशनच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत कार्यकारिणीची  नव्याने बांधणी
करण्यात येऊन अध्यक्षपदी डॉ. अरुण शंकरराव खैरे तर सचिव पदी डॉ. अर्जुन
शेळके यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.
बदनापूर तालुक्यातील वैद्यकीय सेवा देणार्‍या सर्व डॉक्टर्सनी एकत्रित
येऊन संघटना स्थापन केलेली असून मागील वर्षी जाहीर झालेल्या
कार्यकारिणीने उत्कृष्ट काम करत असोसिएशनच्या कामाचा ठसा उमटवला होता.
नुकतीच तालुक्यातील सर्व डाक्टर्सची बैठक झाली. या बैठकीत मागील वर्षी
झालेल्या कामाचा आढावा घेण्यात आला. मागील कार्यकारिणीने केलेल्या
उत्कृष्ट कामामुळे तिच कार्यकारिणी कायम ठेवण्याचा निर्णय एकमताने
घेण्यात आला. तालुका कार्यकारिणी जाहीर करून असोसिएशनच्या माध्यमातून
सामाजिक कार्य आणखी जोमाने करण्याचे ठरवण्यात आले.
या वेळी जाहीर झालेल्या कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी डॉ. अरुण शंकरराव
खैरे, उपाध्यक्षपदी डॉ. किरण जर्‍हाड, सचिवपदी डॉ. अर्जुन शेळके. तर
कोषाध्यक्ष  म्हणून डॉ. गौरव तातेड यांची निवड करण्यात आली. डॉ. अविनाश
गाभणे, डॉ. संतोष वाघ व डॉ. शिवा गायकवाड यांनी आहे त्याच
कार्यकारिणीच्या पदाधिकार्‍यांना कायम ठेवावे, त्यांनी चांगले काम केले
आहे असा प्रस्ताव बैठकीत ठेवला असता उपस्थितांनी अनुमोदन देत सदरील
कार्यकारिणी बिनविरोध जाहीर केली. याच वेळी क्रीडा सचिव म्हणून डॉ.
प्रदीप कदम, सांस्कृतिक सचिव (महिला प्रतिनिधी) डॉ. अस्मिता खैरे, डॉ.
अश्विनी गायकवाड, डॉ. कृष्ण सरोदे, आदी उपस्थित होते.

Previous articleराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर पदके मिळवून दिव्यांगांनी देशाचे नाव
Next articleसुखलालजी कुंकलोळ यांचे निधन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here