आशाताई बच्छाव
आर. टी.ओ. कार्यालयाकडे जाणारा रस्ता बनला मृत्यूचा सापळा. स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष.
आरटीओ कार्यालयाकडे जाणारा रस्ता म्हणजे रस्त्यात खड्डे की ,खड्ड्यात रस्ता
प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक 29/11/2024 ची
याविषयी सविस्तर माहिती अशी की, जालन्याचे आरटीओ कार्यालय हे शहरापासून जवळपास आठ ते दहा किलोमीटर अंतरावर आहे. आरटीओ कार्यालयामध्ये वाहनधारकांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते वाहनधारकांना गाड्यांचे नोंदणीकरण, नुतनीकरण तसेच वाहन चालकांचे नवीन लायसन्स, तसेच लायसन्स नूतनीकरण यासह वाहना संदर्भातील अनेक अडचणी सोडविण्यासाठी आरटीओ कार्यालयामध्ये नेहमीच जावे लागते. वाहनांच्या संबंधित कामांसाठी आरटीओ कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ सुरू असते. या माध्यमातून शासनाच्या तिजोरीत फार मोठा कर स्वरूपामध्ये पैसा जमा केल्या जातो .परंतु याच आरटीओ कार्यालयाकडे जाणारा रस्ता मात्र त्याच नागरिकांच्या जीवाला धोकादायक ठरत असून नागरिकांच्या मृत्यूला आमंत्रण देणारा ठरला आहे. आरटीओ कार्यालयाकडे जाणारा रस्ता म्हणजे रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ता अशाच स्वरूपाचा अनुभव दरदिवशी नागरिक घेत आहेत .यामुळे जालना शहराच्या विकास कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.या रस्त्यावर मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. यामुळे संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांना तसेच नागरिकांना या रस्त्यावरून वाहने नेत असताना वाहन चालकांना तसेच पादचारी नागरिकांना सुद्धा तारेवरची कसरत करावी लागत आहे.
आरटीओ कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था पाहून मान शरमेने खाली जात असल्याची प्रतिक्रिया वाहनधारकांनी तसेच वाहन चालकांनी दिली आहे. आरटीओ कार्यालयाचा वापर केवळ पैसा मिळविण्यासाठीच होत असल्याचे काही नागरिकांनी म्हटले आहे. परंतु आरटीओ कार्यालयातील कामकाजासाठी रोज येणाऱ्या वाहनधारकांना तसेच परवानाधारकांसह कार्यालयातील कार्यालय प्रमुख, अधिकारी -कर्मचारी यांच्या जिवित्वास धोका निर्माण झाला धोका आहे .हा धोका स्थानिक प्रशासन खरोखरच कमी करेल का ? सर्व सामान्यांना होणारा त्रास हा बंद होईल का ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.






