आशाताई बच्छाव
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करत भाजपा जिल्हा जालना च्या वतीने संविधान दिन उत्साहात साजरा
जालना (प्रतिनिधी दिलीप बोंडे) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि निर्माते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे सामुहिक वाचन करत संविधानाची प्रत स्वअर्पण करून संविधान दिन भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालय, जालना येथे दि.(२६) रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी भाजपा जालना महानगर अध्यक्ष श्री. सतीश जाधव, जिल्हा सरचिटणीस सिद्धिविनायक मुळे, सोपान पेंढारकर, जिल्हा उपाध्यक्ष धनराज काबलीये, अर्जुन गेही, राजेंद्र भोसले, सिद्धेश्वर हजबे, रोशन चौधरी, सुभाष सले, सुदर्शन काळे, अमोल कारंजेकर, आनंद झारखंडे. उमेश पेंढारकर, शुभांगी देशपांडे, सखुबाई पणबिसरे, सोमेश काबलीये, लक्ष्मीबाई लहाने, वैशाली बनसोडे, वर्षा ठाकुर, ममता कोंड्याल, शैला निकाळजे, दत्ता जाधव, बद्रीनाथ भसांडे, नारायण वाकचौर, करण निकाळजे, सतीश केळकर, विलास कापसे, रामलाल जाधव, शाम जाधव, अभिजित अंभोरे, सतीशचंद्र प्रभू, कैलास मोहिते, राजु गवई, योगेश सामलेटी, समर्पण विजयसेनानी, राजकुमार जैन, गजेंद्र ठाकुर, विकास कदम, सागर वाहूळकर, बबन शेजूळ, गुलाब पनबिसरे यांच्यासह असंख्य भाजपा कार्यकर्ते या विजय उत्सवात सहभागी झाले होते.