Home विदर्भ नारी रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल मीराताई कदम यांचा सत्कार

नारी रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल मीराताई कदम यांचा सत्कार

207

आशाताई बच्छाव

1000992162.jpg

नारी रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल मीराताई कदम यांचा सत्कार
हिंगोली, श्रीहरी अंभोरे पाटील ब्युरो चीफ –येथील जिजामाता नगर येथे असलेल्या निराधार मुलांचे वस्तीग्रह सेवासदन हिंगोली येथील वसतिगृहाच्या संचालिका सहशिक्षिका तसेच समाजसेविका मिराताई धनराज कदम यांना लोकसत्ता नारी रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल. प्रा. पंजाब आंबोरे, वसमत येथील वाचनालयाचे शेक इब्राहिम, वसमत येथील नवोदय विद्यालयातील शिक्षक राजेश यादव, रहमत यांनी हिंगोली येथील निराधार मुलांचे सेवासदन ला भेट देऊन मीराताई कदम यांना लोकसत्ताचा नारी रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल मीराताई कदम यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
निराधार मुलांचे वस्तीगृह सेवा सदन ला भेट दिल्याबद्दल खूप समाधान वाटले असे यावेळी प्रा पंजाब आंभोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. निराधार मुलांचे वस्तीग्रह सेवा सदन यांना शासनाचे अनुदान नसतानाही आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांना मोफत शिक्षण देणे व त्यांचा संगोपन करणे हे फार मोठे काम असून सुद्धा हे काम मीराताईंनी केलं त्याबद्दल मीराताईंचे खूप खूप अभिनंदन असे यावेळी अंभोरे सर यांनी आपले मत व्यक्त केले.
यावेळी सेवा सदन चे धनराज कदम, पत्रकार शिवाजी कऱ्हाळे अमर गायकवाड ,अमर साखरे यांच्यासह सेवा सदनमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleपरळीत वैद्यनाथ मंदिर परिसरातील फाटकाचा विषय न.प. मुख्याधिकाऱ्याकडून दुर्लक्षित – अँड.मनोज संकाये
Next articleबीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता पुढच्या हप्त्याची प्रतीक्षा!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.