Home जालना भोकरदन मध्ये श्री संतोष पाटील दानवे यांचा दणदणीत विजय

भोकरदन मध्ये श्री संतोष पाटील दानवे यांचा दणदणीत विजय

113
0

आशाताई बच्छाव

1000984822.jpg

भोकरदन मध्ये श्री संतोष पाटील दानवे यांचा दणदणीत विजय
तालुका प्रतिनिधी- जाफराबाद
दिनांक – 24/11/2024
सविस्तर वृत्त असे की भोकरदन जाफराबाद मतदार संघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार श्री संतोष पाटील दानवे यांनी पहिल्या फेरी पासुन आघाडी घेत राष्ट्रवादीचे उमेदवार श्री चंद्रकांत दानवे यांचा 23167 मतांची आघाडी घेऊन दणदणीत पराभव केला.या मतदार संघामध्ये ही लढत फारशी अटीतटीची झाली नाही. आमदार श्री संतोष पाटील दानवे यांनी मोठी आघाडी घेऊन सहज असा आपला विजय नोंदवला. विजयी झाल्या नंतर भोकरदन तसेच जाफराबाद तालुक्यात कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून आणि फटके फोडून विजयी आनंद साजरा केला. भोकरदन शहरात खूप मोठा जण समुदाय जमला होता. निकाला नंतर मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत गुलालाची खूप मोठ्या प्रमाणात उधळण करण्यात आली.टीप्पट भरून गुलाल उधळून मिरवणुकीतील नागरिकांनी आनंद व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here