Home जालना गर्दीचे रूपांतर मतपेटीत होत नाही – कैलास गोरंटयाल —————————————-

गर्दीचे रूपांतर मतपेटीत होत नाही – कैलास गोरंटयाल —————————————-

28
0

आशाताई बच्छाव

1000909105.jpg

गर्दीचे रूपांतर मतपेटीत होत नाही – कैलास गोरंटयाल
—————————————-
जालना (दिलीप बोंडे ब्युरो चीफ) मोठे शक्ती प्रदर्शन करत गर्दी जमवली असली तरी त्याचे रूपांतर मतपेटीत होत नाही असा टोला महाविकास आघाडीचे जालना विधानसभा मतदार संघातील अधिकृत उमेदवार आ. कैलास गोरंटयाल यांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार अर्जुन खोतकर यांना लगावला आहे.
जालना विधानसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार अर्जुन खोतकर यांनी भव्य शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे जालना विधानसभा मतदार संघातील उमेदवार आ. कैलास गोरंटयाल यांच्याशी उपस्थीत पत्रकारांनी संवाद साधला असता ते म्हणाले की, नवीन उमेदवार असल्यास ते शक्तिप्रदर्शन करतात. आम्ही तर मैदानात आहोत. शक्ती प्रदर्शनाची पद्धत आता बंद झाली असून आज रॅलीला झालेली गर्दी ही लक्ष्मी रूपाने झाल्याची टीका गोरंटयाल यांनी केली. पक्षातील बंडखोरी बाबत विचारले असता ते म्हणाले की, या बाबत पक्षश्रेष्ठी योग्य तो निर्णय घेतील. प्राप्त नामनिर्देशन पत्रांची उद्या बुधवारी छाननी होत असून दि. ४ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून या दिवशी जालना विधानसभा मतदार संघातील सर्व चित्र स्पष्ट होईल असा आशावाद व्यक्त करून त्यानंतर काय ते बघू असे देखील गोरंटयाल यांनी स्पष्ट केले. कुणी शक्ती प्रदर्शन करत गर्दी जमवल्याने काही होत नाही. लोकांचं आता ठरलं असून पाच वर्षे कुणी काय काम केले ही बाब लक्षात घेऊनच जनता पाठीशी उभी राहते. पक्षाचा एबी फॉर्म मला मिळाला असून लोकशाही असल्याने उमेदवारी मागण्याचा सर्वांना अधिकार असतो. त्यामुळे फॉर्म कुणीही भरू शकतो. त्यांना आपण थांबवू शकत नाही. जालना विधानसभा मतदार संघात झालेल्या बंडखोरी बाबत काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील.

Previous articleछाननी अंतिम भंडारा जिल्ह्यात ७१ उमेदवार वैद्य
Next articleविधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024  विधानसभा निवडणूक प्रक्रिया निष्पक्षपणे आणि निर्भय वातावरणात पार पाडावी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here