Home जालना विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 श्री. गुरु गणेश अंध विद्यालयात दिव्यांग मतदारांसाठी  जनजागृत्तीपर कार्यक्रम

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 श्री. गुरु गणेश अंध विद्यालयात दिव्यांग मतदारांसाठी  जनजागृत्तीपर कार्यक्रम

24
0

आशाताई बच्छाव

1000902611.jpg

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024

श्री. गुरु गणेश अंध विद्यालयात दिव्यांग

मतदारांसाठी  जनजागृत्तीपर कार्यक्रम

 

जालना, दि.28 (दिलीप बोंडे ब्युरो चीफ) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या पार्श्वभूमिवर दिव्यांग मतदारांना येणाऱ्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून सक्षम ॲप तयार केले आहे. तरी  सक्षम ॲप त्याबाबतची माहिती सर्व दिव्यांग मतदारांना होणे आवश्यक आहे. सर्व गोष्टींची प्रचार व प्रसिध्दी तसेच दिव्यांग मतदारांमध्ये जनजागृत्ती करुन मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या हेतुने जालना येथील गुरुगणेश अंध विद्यालय जनजागृत्तीपर कार्यक्रम  पार पडला.

जनजागृतीपर कार्यक्रमास दिव्यांग नोडल अधिकारी तथा समाज कल्याणचे सहायक आयुक्त अनंत कदम, दिव्यांग आयकॉन डॉ. निकेश मदारे,  प्राचार्य रमेश नाहार,  सहायक नोडल अधिकारी अतिश ससाणे आदि प्रमुख उपस्थित होते.

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने राज्यामध्ये बुधवार दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग व्यक्तीसाठी मदत कक्ष व त्यांना मतदान करण्यासाठी निवडणूक आयोगामार्फत पुरविण्यात येणाऱ्या सोयी- सुविधा आदिची दिव्यांग मतदारांमध्ये जनजागृती करुन त्यांना मतदानास प्रोत्साहित करण्यात येत आहे. दिव्यांग व्यक्ती तसेच शाळेतील दिव्यांग विद्यार्थी, शिक्षक, कर्मचाऱ्यांना आयोगामार्फत दिव्यांग व्यक्तीसाठी पुरविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधाबाबत मार्गदर्शन  करुन बुधवार दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत सर्वांनी मतदान अवश्य करावे, असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमास विद्यालयातील दिव्यांग शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

Previous articleशक्ती प्रदर्शन न करता कैलास गोरंटयाल यांचा उमेदवारी अर्ज दाखल
Next articleजालना विधानसभेसाठी बाबासाहेब वानखेडे यांची उमेदवारी दाखल
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here