Home जालना शक्ती प्रदर्शन न करता कैलास गोरंटयाल यांचा उमेदवारी अर्ज दाखल

शक्ती प्रदर्शन न करता कैलास गोरंटयाल यांचा उमेदवारी अर्ज दाखल

18
0

आशाताई बच्छाव

1000902582.jpg

शक्ती प्रदर्शन न करता कैलास गोरंटयाल यांचा उमेदवारी अर्ज दाखल
—————————————-
मविआ नेते, पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
—————————————-
जालना (दिलीप बोंडे ब्युरो चीफ) जालना विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ.कैलास गोरंटयाल यांनी आज सोमवारी कोणतेही शक्ती प्रदर्शन न करता महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकाऱ्यांसह जावून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
जालना विधानसभा मतदार संघातून गोरंटयाल यांना दोन दिवसांपूर्वीच काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. जालना लोकसभेचे पक्षाचे प्रभारी डॉ.पी.सी.शर्मा, खा. डॉ. कल्याण काळे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मुरलीधर शेजुळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष नंदकिशोर जांगडे, काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक सेलचे प्रदेश पदाधिकारी बदर चाऊस, अब्दुल रउफ परसुवाले, रिपाईचे पदाधिकारी किशोर मघाडे, सपाचे जिल्हाध्यक्ष शेख नबी शिपोरकर, आपचे जिल्हाध्यक्ष संजोग हिवाळे, विधीज्ञ जक्कलवार, सय्यद याकूब आदींची यावेळी उपस्थिती होती. जालन्याचे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमंत हरकर व तहसिलदार तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी श्रीमती छाया पवार यांच्याकडे महाविकास आघाडीचे उमेदवार आ. कैलास गोरंटयाल यांनी पक्षाच्या एबी फॉर्मसह आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी उपस्थित पत्रकारांशी बोलतांना उमेदवार आ. कैलास गोरंटयाल यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारांवर जोरदार टीका करत निवडणुकीतील आपले इरादे स्पष्ट केले.
————
(छाया : दीपक इगेवार)

Previous articleउमेदवारी अर्ज भरण्यासाठी घनसावंगीत उसळला जनसागर
Next articleविधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 श्री. गुरु गणेश अंध विद्यालयात दिव्यांग मतदारांसाठी  जनजागृत्तीपर कार्यक्रम
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here