Home बुलढाणा पॉलिटिक्स ! चैनूभाऊच ! – चैनसुख संचेती यंदा देणार विजयाची ललकारी !

पॉलिटिक्स ! चैनूभाऊच ! – चैनसुख संचेती यंदा देणार विजयाची ललकारी !

100

आशाताई बच्छाव

1000895751.jpg

पॉलिटिक्स ! चैनूभाऊच ! – चैनसुख संचेती यंदा देणार विजयाची ललकारी !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- मलकापूर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार राजेश एकडे यांचे कट्टर प्रतिस्पर्धी समजले जाणारे उमेदवारी घोषित
झालेले भाजपाचे अधिकृत उमेदवार चैनसुख संचेती निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरले असून विजयाचा गुलाल चैनसुख संचेती यांचाच अशी गगनभेदी घोषणा मलकापूर – नांदुरा मतदार संघात घुमत आहे. भाजपाच्या दुसऱ्या उमेदवार यादीत संचेती यांचे नाव आल्याने कार्यकर्ते जल्लोष साजरा करत आहे

त्यामुळे. विद्यमान काँग्रेसचे आमदार एकडे यांच्या विरोधात भाजपाचे माजी आमदार चैनसुख संचेती यांची लढत रंगणार असून संचेती यांच्या उमेदवारी घोषित झाल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष करून विजयाची ललकारी दिल्याने यंदा गुलाल कुणावर उधळल्या जातो? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.