Home जालना जि.प.प्रा.शाळा निवडुंगा येथे दिलीपभाऊ वाघ यांच्या हस्ते बोरवेलचा लोकार्पण सोहळा संपन्न

जि.प.प्रा.शाळा निवडुंगा येथे दिलीपभाऊ वाघ यांच्या हस्ते बोरवेलचा लोकार्पण सोहळा संपन्न

12
0

आशाताई बच्छाव

1000819086.jpg

जि.प.प्रा.शाळा निवडुंगा येथे दिलीपभाऊ वाघ यांच्या हस्ते बोरवेलचा लोकार्पण सोहळा संपन्न
तालुका प्रतिनिधी जाफराबाद-मुरलीधर डहाके
दिनांक 06/ 10/2024

जाफराबाद तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निवडुंगा येथे श्री दिलीपभाऊ वाघ यांच्या दातृत्वामुळे शाळेतील बंद पडलेल्या बोरवेलमध्ये एक एचपीची मोटार, 300 फूट वायर, 300 फूट पाईप व एक स्टार्टर एवढ्या संचाचे लोकार्पण आज दिलीप भाऊ वाघ व शिवव्याख्याते कृष्णा इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना यांनी जीवन हे लोकसेवेसाठी अर्पण करावे व आपल्या मिळकतीचा काही हिस्सा समाजासाठी खर्च करावा असे प्रतिपादन केले तसेच भविष्यात काही गरज लागल्यास ती मदत करण्याचे आश्वासन दिले यावेळी केंद्रप्रमुख मांटे व गावातील विविध नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त करून दिलीपभाऊ वाघ यांचे आभार मानले. यावेळी किरण ऍग्रो कंपनी तर्फे विजय जगताप यांनी सर्व विद्यार्थ्यांना प्रती विद्यार्थी एका ड्रेसचे वाटप कंपनीतर्फे करण्यात येईल असे आश्वासन दिले. या कार्यक्रम प्रसंगी पत्रकार चंद्रकांत पंडित, डोणगाव केंद्राचे केंद्रप्रमुख गजानन मांटेसर,सरपंच प्रकाश झिने, ग्रामपंचायत सदस्य बद्रीभाऊ जगताप, बळीराम जगताप, प्रल्हाद जगताप तसेच बाबासाहेब जगताप,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश जगताप, गजानन वाघचौरे, कैलास तायडे, बालु जगताप, बाबासाहेब महाराज, शिवाजी जगताप, भागवत जगताप ,राजेंद्र जगताप ,सुनील जगताप, कडुबा जगताप, सुरेश जगताप, सुदाम वाघचौरे ,उत्तम जगताप, सुदाम बंगाळे इत्यादी प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश उगलमुगले यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक रामेश्वर राठोड, नवनाथ शिंदे,पुष्पा आघाव,संभाजी चाटे,सुभाष मांटे आदींनी प्रयत्न केले.

Previous articleमाहोरा येतील रेणुका माता नगर येथे नवरात्र निमित्त तीसऱ्या माळेला गरबा व दांडीया संपन्न
Next articleनविन मोंढा जालना येथुन ट्रकची चोरी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here