Home बुलढाणा या पित्याच्या चुकीला देशाची माफी नाही! -काय केले या क्रूर पित्याने ?

या पित्याच्या चुकीला देशाची माफी नाही! -काय केले या क्रूर पित्याने ?

68
0

आशाताई बच्छाव

1000818149.jpg

या पित्याच्या चुकीला देशाची माफी नाही! -काय केले या क्रूर पित्याने ?
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-खामगाव बाप एवढाही निष्ठावर असू शकतो काय ? हा प्रश्न देशवासीयांना पडला आहे. कारण या बापाने दोन चिमुकल्या लेकींना पुलावरून नदीत फेकले. यामुळे दोन्ही निरागस बालिकांचा करुण अंत झाला. निष्ठुर पित्याच्या या टोकाच्या पावलाने बुलढाणाच काय अख्खा देश हादरून गेला.
काल रात्री उशीरापर्यंत हा भीषण घटनाक्रम घडला.
शनिवारी ५ ऑक्टोबरच्या रात्री दीड ते दोन वाजेदरम्यान दोन्ही बहिणींचे मृतदेह हाती लागले. प्रकरणी पित्यास खामगाव ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले असून, घरगुती वादातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक चौकशीत उघडकीस आले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील लाखनवाडा नजिक असलेल्या लोणी कदमापूर येथील आरोपी पित्याचे नाव शेख हारून शेख शब्बीर असे आहे. निर्दयी बापानेच सात वर्षीय कुमारी सदफ व नऊ वर्षीय कुमारी आलिया या दोघा चिमुकल्या बहिणींना बाळापूर जिल्हा अकोला नजीकच्या नदीत फेकले. बाळापुर ते अकोला या राष्ट्रीय महामार्गावरील विटांच्या भट्टया असलेल्या परिसरात हे कृत्य केले.
अश्या संघर्षमय जीवनात

अनुकूल परस्थिती नसतांना फिटनेस ची आवड असलेल्या जावेदने ‘कोशिश करने की हार नही होती’ हे लक्षात ठेवले. जावेदची जिममध्ये फी देण्याची क्षमता नसल्याने जावेदने भंगार मधील टाकाऊ साहित्याच्या साह्याने आपल्या घरातील टिन पत्राच्या खोलीतच जिम तयार केला.

फिटनेसकडे लक्ष देत असतांना सोशल मीडिया द्वारे तरूणांना फिटनेसचे धडे देणे व त्यांना सुदृढ आरोग्याकडे आकर्षित करण्यासाठी जावेदने युट्यूब, इंस्टाग्राम वर फिटनेसचे धडे देत अनेकांना निरामय व सुदृढ आरोग्यासाठी शारीरिक कसरत करण्यास भाग पाडले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here